• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आचारसंहितेचा भंग करूनही Dharashiv 2.0 वर कारवाई नाही; शिवसेना (उबाठा)चा रोष उसळला, आंदोलनाचा इशारा

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत Dharashiv 2.0 या इंस्टाग्राम पेजने सरळसरळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी बोगस एक्झिट पोल टाकला—असा आरोपशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.  मात्र, असं असतानाही प्रशासनाने घेतलेली संशयास्पद शांतता आणि कारवाईतील उठाठेव यावर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी या संपूर्ण प्रकारावर प्रशासनाचे दुटप्पी धोरण असल्याचे उघड केले आहे.

Dharashiv 2.0 चा बोगस पोल, मतदारांमध्ये संभ्रम — तरीही प्रशासन शांत!

निवडणूक काळात Dharashiv 2.0 या पेजवर टाकण्यात आलेला एक्झिट पोल पूर्णपणे खोटा, भ्रामक आणि मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी रचनाबद्ध रितीने पसरवलेला होता. हा प्रकार थेट आचारसंहितेचा भंग असूनही संबंधित पेजवर एकही तातडीची कारवाई न होणे हे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उठवणारे आहे. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. काही तासात शहरभर त्याची चर्चा सुरु झाली. विरोधकांकडूनही हा प्रयत्न “सार्वजनिक मतप्रवाह वळवण्यासाठीचा घोर कट” असा म्हटला जात आहे.

सूर्यवंशींची तातडीची तक्रार — जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवले पुढे… पण पुढे कायच झालं नाही!

या प्रकारावर तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना लेखी तक्रार देऊन Dharashiv 2.0 पेजवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवले. पण तिथून पुढे फाईल केवळ थंडगार खोलीत धूळ खात पडून राहिली. आचारसंहिता कक्ष प्रमुख नलावडे यांच्याकडे पत्र दिलं—पण तीन-चार दिवस त्यावर एकही उत्तर नाही, एकही प्रतिसाद नाही, कारवाईचा एकही ठोका नाही.

“असा मौन म्हणजे थेट संरक्षण!”  सूर्यवंशींचा प्रशासनावर हल्ला


सततची टोलवाटोलवी होत असल्याने सूर्यवंशी यांनी थेट निवडणूक आयोगालाच मेलद्वारे तक्रार पाठवली.
आणि आश्चर्य म्हणजे निवडणूक आयोगाने तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना ‘स्वयंस्पष्ट अहवाल सादर करा’ असे आदेश दिले! म्हणजे प्रश्न असा की, निवडणूक आयोगाला तात्काळ कारवाई दिसते, पण स्थानिक प्रशासनाच्या नजरेत हा गंभीर गुन्हा का दिसत नाही?

हे मौन आहे की संरक्षण? हे विलंब आहे की हेतूपुरस्सर दिरंगाई? फेक पोल हटवला, पण हेतू साध्य झाल्यानंतरच —



दरम्यान, राकेश सूर्यवंशी यांनी प्रशासनावर  घणाघाती टीका करत Dharashiv 2.0 ने फेक एक्झिट पोल मात्र हटवला मात्र, हेतू साध्य केल्यानंतरच तो पोल हटवला गेला असल्याचं म्हटलं आहे या मुद्द्यावर सूर्यवंशी संतापाने म्हणाले, “हेतू साध्य झाल्यावर पोस्ट हटवणे म्हणजे धाडस नाही, ते अपराधाची कबुली आहे. लोकांची फसवणूक करून पोल काढला म्हणजे पाप धुवून गेले का?” असा सवाल देखील राकेश सूर्यवंशी यांनी हॅलो धाराशिला बोलताना उपस्थित केला आहे.

कारवाईचं नाव नाही — काहींची पृष्ठभूमी मजबूत की प्रशासन कमकुवत?

प्रशासनाची भूमिका अधिकच संशयास्पद ठरत आहे.
बोगस पोल टाकणारे खुलेआम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत.पोल हटवून स्वतःची पाठ वाचवत आहेत. आणि प्रशासन मात्र साधं नोटीसही न काढता पूर्णत: मौन बाळगत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांमधून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धाराशिव 2.0 ला नेमकं कोण वाचवत आहे? निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या गुन्ह्यानंतरही शांतता का? Dharashiv 2.0 च्या पाठीशी कोणाचा हात? आहे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

“कारवाई नसेल तर रस्त्यावर उतरू!” – राकेश सूर्यवंशी

या सर्व प्रकरणावर इशारा देत देत सूर्यवंशी म्हणाले—

“निवडणुकांचा अपमान करणाऱ्या आणि मतदारांची दिशाभूल करणाऱ्या Dharashiv 2.0 वर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने डोळे मिटून बसायचं असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. लोकशाहीचा गळा घोटू देणार नाही.”

संघर्ष वाढणार? प्रशासनावर दडपण आणि Dharashiv 2.0 वर वाढती चौकशीची मागणी

संपूर्ण शहरात आता या प्रकरणाची चर्चा आहे.
एक्झिट पोल हा छोटा प्रकार नाही—
तो निवडणूक प्रक्रियेवर थेट आघात आहे.

• प्रशासनाची चुप्पी
• सोशल पेजची मनमानी
• मतदारांची दिशाभूल
• आणि राजकीय वातावरणात निर्माण झालेला संशय

या सगळ्यांनी परिस्थिती आणखी पेटण्याची शक्यता वाढली आहे.

Previous Post

विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २० मध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, भाजपाची ताकद आणखी वाढली

Next Post

“Dharashiv 2.0 च्या फेक एक्झिट पोलवरून वाद पेटला, मतदानापूर्वी पोल टाकणे गंभीर गुन्हा, काय आहे ‘या’ गुन्ह्याची शिक्षा?

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

क्राईम

पत्रकार सुनील ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर, ॲड. विशाल साखरे यांचा जोरदार युक्तिवाद

क्राईम

“बनावट मीडीयाचा पर्दाफाश”, धाराशिव नगरपालिका निवडणुकीत फेक एक्झिट पोल प्रकरणात अखेर धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल…

Next Post

“Dharashiv 2.0 च्या फेक एक्झिट पोलवरून वाद पेटला, मतदानापूर्वी पोल टाकणे गंभीर गुन्हा, काय आहे 'या' गुन्ह्याची शिक्षा?

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share