• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“Dharashiv 2.0 च्या फेक एक्झिट पोलवरून वाद पेटला, मतदानापूर्वी पोल टाकणे गंभीर गुन्हा, काय आहे ‘या’ गुन्ह्याची शिक्षा?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत मोठा वाद पेटला आहे. Dharashiv 2.0 या सोशल मीडिया अकाउंटवरून मतदानापूर्वी बोगस एक्झिट पोल टाकल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी या घटनेवर थेट संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की Dharashiv 2.0 या सोशल मीडिया अकाउंटवर  टाकलेला फेक एक्झिट पोल मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता, आणि संबंधित सोशल मीडिया अकाउंटवर कोणतीही तातडीची कारवाई न होणे हे गंभीर मुद्दा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश


सूर्यवंशींनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना लेखी तक्रार दिली, ज्याला जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पुढे पाठवण्यात आली मात्र अद्याप पर्यंत या संदर्भात कोणतेही कारवाई करण्यात आली नाही.
सूर्यवंशींनी या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडेही मेलद्वारे पाठवली, ज्यावर आयोगाने तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. राकेश सूर्यवंशींचा सवाल आहे की निवडणूक आयोगाला हा गंभीर गुन्हा दिसतो, पण स्थानिक प्रशासनाला का दिसत नाही? असा सवाल राकेश सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.

तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद

भारताच्या Representation of the People Act, 1951 – कलम 126A नुसार, मतदान सुरू होण्यापूर्वी किंवा मतदान चालू असताना कोणताही एक्झिट पोल, मतदारांचा अंदाज किंवा कोण जिंकणार यावरील सर्व्हे प्रकाशित करणे गुन्हा ठरतो. या उल्लंघनासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. त्यामुळे Dharashiv 2.0 पेजवर टाकलेला फेक पोल हा थेट कायद्याचा भंग करणारा गंभीर प्रकार मानला जातो.

हेतू साध्य झाल्यावर पोस्ट हटवणे म्हणजे अपराधाची कबुली  – राकेश सूर्यवंशी

दरम्यान पुढे बोलताना राकेश सूर्यवंशी म्हणाले की, फेक पोल नंतर हटवला गेला असला तरी, सूर्यवंशींचा आरोप आहे की हे हेतू साध्य झाल्यानंतरच केले गेले, ज्यामुळे पोल टाकणाऱ्यांच्या उद्देशाची स्पष्टता दिसते. ते म्हणाले, “हेतू साध्य झाल्यावर पोस्ट हटवणे म्हणजे अपराधाची कबुली आहे. लोकांची फसवणूक करून पोल काढला म्हणजे पाप धुतले जात नाही.” सूर्यवंशी यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर Dharashiv 2.0 वर तातडीने कारवाई झाली नाही, तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तयार आहेत. शहरभर नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रश्‍नचिन्ह वाढले आहे: Dharashiv 2.0 च्या पाठीशी कोणाचा हात आहे, आणि प्रशासन इतकी शांतता का बाळगते? संपूर्ण प्रकरणातून स्पष्ट झाले आहे की Dharashiv 2.0 चा फेक एक्झिट पोल निवडणूक प्रक्रियेवर थेट आघात करणारा प्रकार असून, प्रशासनाची निष्क्रियता आणि पोल हटवण्याची विलंबित पद्धत लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.

Previous Post

आचारसंहितेचा भंग करूनही Dharashiv 2.0 वर कारवाई नाही; शिवसेना (उबाठा)चा रोष उसळला, आंदोलनाचा इशारा

Next Post

बनावट एक्झिट पोल प्रकरणात प्रशासनाचे संशयास्पद मौन— आदेश असूनही FIR नाही! धाराशिव प्रशासनावर जनतेचा रोष

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

Next Post

बनावट एक्झिट पोल प्रकरणात प्रशासनाचे संशयास्पद मौन— आदेश असूनही FIR नाही! धाराशिव प्रशासनावर जनतेचा रोष

"बनावट मीडीयाचा पर्दाफाश", धाराशिव नगरपालिका निवडणुकीत फेक एक्झिट पोल प्रकरणात अखेर धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल...

“संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू” –नगरपालिका निकालाच्या पराभवानंतरही कार्यकर्त्यांना दिला आत्मविश्वास

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share