• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

Azar R Shaikh by Azar R Shaikh
2026/07/20 08:49 pm
0
जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

धाराशिव : प्रतिनिधीनवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांवर झालेल्या लाठीचार्जवर धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’, अशा शब्दांत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांवर करण्यात आलेला लाठीहल्ला हा केवळ आंदोलनकर्त्यांवर झालेला हल्ला नसून, भारतीय संविधान आणि लोकशाहीवर झालेला थेट हल्ला असल्याचा घणाघात त्यांनी केला.जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत नसलेल्या मोदी सरकारने आता लाठीच्या जोरावर आवाज दाबण्याचा मार्ग स्वीकारला आहे. हा लोकशाहीचा नव्हे, तर हुकूमशाहीचा चेहरा आहे, असा थेट आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला.आंदोलन दडपण्यासाठी मेट्रो सेवा बंद करून सामान्य नागरिकांनाही वेठीस धरण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. जनतेच्या भावना आणि प्रश्न समजून घेण्याऐवजी विरोधाचा प्रत्येक आवाज चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली.‘प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर मौन, हीच आजच्या केंद्र सरकारची ओळख बनली आहे,’ अशा शब्दांत आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.लोकशाही व्यवस्थेत संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात. मात्र, सरकारकडून संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचा आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी ‘लोकशाहीत संवादाची भाषा असते; हुकूमशाहीत लाठीची,’ असा जोरदार टोला लगावला.जंतर-मंतरवरील घटनेला त्यांनी देशातील लोकशाही गुदमरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या घटनेवरून आता विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

Previous Post

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

Next Post

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक

Azar R Shaikh

Azar R Shaikh

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!
जिल्हा

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक
जिल्हा

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

Next Post
काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share