• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Azar R Shaikh by Azar R Shaikh
2026/07/18 09:17 pm
0
विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव येथील प्रस्तावित केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेतील सर्वात मोठा अडसर ठरलेला जागेचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यालय सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेचे केव्हीएस पथक सोमवारी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी धाराशिव येथे येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार सीबीएसई शिक्षणाची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सातत्याने आपण याबाबत पाठपुरावा करीत होतो. केंद्रीय विद्यालयासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधला गेला. त्यानंतर विद्यालयासाठी तात्पुरती तसेच कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. याशिवाय, भविष्यात केंद्रीय विद्यालयाचा कायमस्वरूपी सुसज्ज आणि अद्ययावत परिसर उभारण्यासाठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या निवासी वसाहतीमागील सुमारे पाच एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही झाला आहे. संबंधित प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्रीय विद्यालय संघटनेकडे पाठविण्यात आला आहे. त्या जागेचीही पाहणी करण्यासाठी केव्हीएसचे पथक सोमवारी धाराशिवला येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

उपलब्ध असलेली जमीन, तात्पुरती इमारत आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांची केंद्रीय विद्यालय संघटनेकडून तपासणी करून तसा प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी दाखल केला जाणार आहे. मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर विद्यालय सुरू करण्याचा आदेश जारी केला जाईल. केंद्रीय विद्यालय सुरू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे पर्व सुरू होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रम, आधुनिक शिक्षणपद्धती, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक शिक्षण, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रमांचा लाभ स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

तसेच JEE, NEET, NDA, CUET यांसारख्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात सातत्य राहील तसेचआधुनिक प्रयोगशाळा, संगणक शिक्षण, क्रीडा व सहशैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील. पुणे, सोलापूर, लातूरसारख्या शहरांत शिक्षणासाठी स्थलांतराची गरज कमी होऊन पालकांचा आर्थिक भारही हलका होईल आणिधाराशिवच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद देणार तात्पुरती जागा :

आमदार राणाजगजितसिंह पाटीलकेंद्रीय विद्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात डीआयसी रोडवरील प्रशस्त जागा आणि सुसज्ज इमारत उपल्ब्ध करून देण्याचा ठराव नवीन जिल्हा परिषदेच्या सभागृहाने यापूर्वीच मंजूर केला आहे.डाएट इमारतीसमोरील जिल्हा परिषदेच्या प्रशालेतील प्रशस्त २५ वर्गखोल्या, सुसज्ज ग्रंथालय, एक मोठे सभागृह, वाहनतळ आणि तीन एकर जागा केंद्रीय विद्यालयास उपल्ब्ध करून दिली जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Continue Reading
Previous Post

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

Next Post

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

Azar R Shaikh

Azar R Shaikh

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

तुळजापूर घडणार! अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाचे हब..! जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ऐतिहासिक निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post
फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. - सोमनाथ गुरव

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share