• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/08/19 11:40 am
0
संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

धाराशिव : ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर तसेच भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होणार आहे. या प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना झाले असल्याची माहिती तानाजी जाधवर यांनी दिली.रामेश्वर शेटे हे भाजपमधील सक्रिय आणि दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात.

जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आणि राजकीय प्रभाव आहे. ते वकील आघाडीचे जिल्हा संयोजक, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष तसेच विधी विभाग, धाराशिव जिल्हा या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उबाठा पक्षाच्या संघटनेला मोठी ताकद मिळणार आहे.संजय निंबाळकर हे देखील सक्रिय राजकारणात असून, जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत आणखी भर पडणार आहे.

दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उबाठाची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात उबाठा पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षफूट झाली आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याने संघटनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.मात्र, या कठीण काळात आमदार कैलास पाटील यांनी पक्षाची ताकद टिकवून ठेवण्याची आणि संघटना पुन्हा उभी करण्याची जबाबदारी प्रभावीपणे स्वीकारली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत, नव्या नेतृत्वाला पक्षाशी जोडत आणि जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करत कैलास पाटील यांनी उबाठाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला आहे.

एकीकडे पक्षाला मोठ्या राजकीय धक्क्यांचा सामना करावा लागला असताना कैलास पाटील यांनी पक्षाची उरलेली ताकद वाचवण्यासोबतच ती वाढवण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता जिल्ह्यातील प्रभावशाली आणि सक्रिय नेते पुन्हा उबाठाच्या गोटात येताना दिसत आहेत.संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटे यांचा आजचा प्रवेश हा कैलास पाटील यांच्या संघटनात्मक प्रयत्नांना मिळालेला महत्त्वाचा राजकीय प्रतिसाद मानला जात आहे.

आगामी काळात आणखी काही दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उबाठामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असल्याने धाराशिवच्या राजकारणात कैलास पाटील यांच्या नेतृत्वाची आणि पक्षबांधणीच्या प्रयत्नांची चर्चा रंगली आहे.

Continue Reading
Previous Post

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

Next Post

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ
राजकारण

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”
राजकारण

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

Next Post
‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share