धाराशिव जिल्ह्यातील today समाचार न्यूज चॅनेलचे संपादक हुकमत मुलाणी यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे.
हुकमत मुलाणी यांनी अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय राहून अनेक महत्त्वाच्या घडामोडी समाजापर्यंत पोहोचवल्या. साधी, थेट व प्रामाणिक लेखणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सामान्य जनतेच्या अडचणी, प्रशासनातील त्रुटी, राजकीय घडामोडी आणि सामाजिक प्रश्न यांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली.
त्यांच्या बातम्यांमुळे अनेकदा प्रशासन हलले, सामान्य जनतेला न्याय मिळाला. म्हणूनच निर्भीड, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते पत्रकार म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.
“दूध का दूध पाणी का पाणी” त्यांची ही टॅगलाईन प्रसिद्ध होती.
पत्रकार हुकमत मुलाणी यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
कुटुंबियांना या दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना.










