• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/13 02:44 am
0
अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमध्ये अ, बं, क, ड मध्ये उपवर्गीकरण करण्याचे षडयंत्रकारी निर्णय घेण्याचे धोरण अवलंबवले असून ते अनुसूचित जातीमधील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे तो निर्णय रद्द करण्यात यावा. तसेच ते उपवर्गीकरण कसे आणि किती घातक आहे ? याची प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी प्रसार, प्रसिद्धी, सल्लागार, व कायदे विषयक सल्लागार या समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या माध्यमातून अनुसूचित जातीमध्ये दरी निर्माण करणारा तो निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी दि.९ जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्यासाठी सर्व घटकांचा विरोध होत आहे. त्यामुळे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस धनंजय शिंगाडे, राजाभाऊ ओहाळ, कैलास शिंदे, नितीन शेरखाने, संजय बनसोडे, राम गायकवाड, ॲड भैय्या साबने, दादासाहेब जेटीथोर, मुकुंद लगाडे, अनिल हजारे, विद्यानंद बनसोडे, आनंद पांडगळे, हरीश डावरे, अरुण बनसोडे, लक्ष्मण शिंदे, राजाभाऊ शिंदे, धनंजय वाघमारे, रवी सुरवसे, गणपती कांबळे, दत्ता कटकधोंड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रचार प्रमुख समितीमध्ये प्रामुख्याने दादासाहेब जेटीथोर, रवी सुरवसे, धनंजय वाघमारे, गणपती कांबळे व राजाभाऊ राऊत यांची तर प्रसिद्धी प्रमुख समितीमध्ये मुकुंद लगाडे, गो.ल. कांबळे, आशितोष बनसोडे, एल.डी. शिंदे व दादासाहेब बनसोडे यांची तसेच सल्लागार समितीमध्ये एस.के. चेले, बंडूभाऊ बनसोडे, भागवत शिंदे, सुनील बनसोडे, बाबासाहेब माने, अरुण माने व बबन वाघमारे यांचा तर कायदेविषयक सल्लागार समितीमध्ये ॲड इंद्रजित शिंदे, ॲड ज्योती बडेकर, ॲड माया सरवदे, ॲड पल्लवी वाघमारे, ॲड अरुणा गवई, ॲड बंडू पौळ आणि ॲड दयानंद बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात उपवर्गीकरण हे अनुसूचित जातीसाठी का घातक आहे ? हे अतिशय मुद्देसूद आणि प्रभावीपणे जनजागृतीद्वारे केले जाणार आहे.

Previous Post

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

Next Post

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

धाराशिव जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांची तात्काळ दुरुस्ती करा; डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांची तात्काळ दुरुस्ती करा; डॉ. प्रतापसिंह पाटील

भूम येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी

भूम येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share