• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/13 01:28 am
0
विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांना ३३६ कोटींचा पीकविमा 

​विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती 

​खरीप २०२५ हंगामातील पीक विम्यासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून धाराशिव जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ४४ शेतकऱ्यांना सुमारे ३३६ कोटी ४६ लाख रुपयांचा पीकविमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमा कंपनीने घेतलेले तांत्रिक आक्षेप राज्यस्तरीय समितीने (STAC) फेटाळून लावल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ अंतर्गत आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड ही विमा कंपनी कार्यरत आहे. जिल्ह्यातील ५५ विमा युनिटमधील ३६८ पीक कापणी प्रयोगांवर कंपनीने आक्षेप नोंदवून अपील केले होते. कंपनीचा दावा होता की, पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया नियमानुसार झालेली नाही. मात्र, धाराशिव जिल्हाधिकारी स्तरावर हे आक्षेप आधीच फेटाळण्यात आले होते. तरीही कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे (STAC) धाव घेतली होती. आपण स्वतः या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग यांची भेट घेतली. सिंग इतर राज्यातील निवडणूक कर्तव्यावर असतानाही शेतकऱ्यांची निकड ओळखून त्यांनी ऑनलाईन सुनावणी घेतली. या सुनावणीत विमा कंपनीचे आक्षेप पुराव्याअभावी फेटाळून लावत जिल्हा समितीने २२ डिसेंबर रोजी घेतलेला निर्णय कायम ठेवला. परिणामी, कृषी आयुक्तालयाने आता पात्र शेतकऱ्यांचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ४४ शेतकरी बांधवांना सुमारे ३३६ कोटी ४६ लाख रुपयांचा पीकविमा वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

​संकटकाळात आधार देणे हेच आपले कर्तव्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील 

जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक असून, सर्वाधिक ४ लाख ४० हजार ४४ अर्जदारांनी सोयाबीनचा विमा उतरवला होता. यातील ४.०५ लाख शेतकऱ्यांना ३३६ कोटींचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळावे यासाठी आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. विमा कंपनीने तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत दिलेली स्थगिती आता उठली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच हा दिलासा मिळेल. बळीराजाला संकटकाळात आधार देणे हेच आपले कर्तव्य असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना ५२४ कोटींची मदत

केवळ पीकविमाच नव्हे, तर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या ७ लाख १३ हजार ८७१ शेतकरी बांधवांना शासनाकडून ५२४ कोटी ७८ लाख रुपयांची मदत यापूर्वीच वितरित करण्यात आली आहे. यामध्ये ५ लाख ७५ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा समावेश आहे. त्यानुसार ​जून महिन्यातील नुकसानीपोटी २२ लाख रुपयांची मदत (१०८६ लाभार्थी), जुलै-ऑगस्ट २०२५ मधील नुकसानीच्या मोबदल्यात १८९ कोटी ६१ लाख रुपये (२.३३ लाख लाभार्थी), ​सप्टेंबर २०२५ मधील नुकसानीचे २९२ कोटी ४९ लाख रुपये (४.०४ लाख लाभार्थी) तर

​सप्टेंबर महिन्यातील अतिरिक्त नुकसानीचे ४२ कोटी ४६ लाख रुपये (६३ हजार लाभार्थी) आपल्या महायुती सरकारने बळीराजाला दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यात जमा केले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Previous Post

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Next Post

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post
अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

धाराशिव जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांची तात्काळ दुरुस्ती करा; डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांची तात्काळ दुरुस्ती करा; डॉ. प्रतापसिंह पाटील

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share