• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Azar R Shaikh by Azar R Shaikh
2026/06/23 08:31 pm
0
“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

मुंबई : आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात बोलताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारला घेतल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी विषयावरील विशेष प्रस्तावावर बोलताना धाराशिव – कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारच्या कृषी धोरणांवर, कर्जमाफी, पीकविमा, कृषी यांत्रिकीकरण आणि शेतकरी मदत योजनांवर तीव्र टीका केली. सरकारच्या घोषणांमध्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठी तफावत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. दरम्यान सभागृहात बोलत असताना आमदार कैलास पाटील यांना सत्ताधारी पक्षातील आमदारांनी “तुम्ही इकडे या” असं म्हटल्यावर आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं की सर्वच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार असा सवाल केला.

पुढे बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, २०१७ मध्ये जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील सुमारे ५ लाख ९० हजार पात्र शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून वंचित असून त्यांचे सुमारे ५,४७५ कोटी रुपये प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे आहे की कर्जवसुली करायची आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ केल्याचा उल्लेख करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मात्र कठोर भूमिका घेतली जात असल्याची टीका त्यांनी केली. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्जदार शेतकऱ्यांची संख्या घटल्यामागे बँकांचे धोरणरा

ज्यात २०२२-२३ मध्ये सुमारे ६१ लाख कर्जदार शेतकरी होते, तर २०२५-२६ मध्ये ही संख्या ४२ लाखांपर्यंत घसरली असल्याचे नमूद करत पाटील यांनी शेतकरी सक्षम झाल्यामुळे नव्हे तर बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. ‘सिबिल’ गुणांकन आणि ‘कूलिंग ऑफ पीरियड’च्या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळत नसल्याने त्यांना सावकारांकडे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टी पॅकेजच्या खर्चाबाबत प्रश्न

दरम्यान आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात बोलताना, मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या अतिवृष्टी पॅकेजपैकी प्रत्यक्ष किती निधी खर्च झाला आणि किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली, याचा हिशोब सरकारने जाहीर करावा, अशी मागणी केली. जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी साडेतीन लाख रुपयांपर्यंत मदतीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची उदाहरणे दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

कृषी यांत्रिकीकरण योजनेवर टीका

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आलेल्या ३६ लाखांहून अधिक अर्जांपैकी सुमारे ३१ लाख अर्ज रद्द करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला. ऑनलाइन प्रणालीतील अडचणींमुळे कागदपत्रे अपलोड करता न आल्याने शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आल्याचे ते म्हणाले.

पीकविमा योजनेवर प्रश्नचिन्ह

राज्यातील ९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असताना सुमारे ३१ हजार कोटी रुपयांच्या संरक्षित रकमेच्या तुलनेत केवळ १,५०० कोटी रुपयांची भरपाई वितरित झाल्याचा दावा पाटील यांनी केला. त्यामुळे पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यांसाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यंदाच्या पावसाच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रिगर’ प्रणाली लागू करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.

नमो शेतकरी आणि इतर योजनांचा मुद्दा

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करत त्यांनी खत, बियाणे आणि शेतीखर्चात झालेल्या वाढीचा उल्लेख केला. कृषी समृद्धी योजनेसाठी जाहीर केलेल्या निधीची पूर्ण तरतूद होत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा, अशी मागणी करत कैलास पाटील यांनी सभागृहात केली

Previous Post

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Next Post

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

Azar R Shaikh

Azar R Shaikh

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!
जिल्हा

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक
जिल्हा

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

Next Post
‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

'असावा एक छंद…' ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

'असावा एक छंद…' ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share