• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

भूम येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी

Azar R Shaikh by Azar R Shaikh
2026/05/21 12:42 am
0
भूम येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी

भूम, दि. 19 मे 2026 : भूम शहरातील भीमनगर परिसरात दि. 15 मे रोजी पवित्र बौद्ध विहार व बौद्ध समाजावर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक,धाराशिव यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर घटनेत बौद्ध समाजाला लक्ष्य करून नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत दंगल, तोडफोड, धार्मिक भावना दुखावणे, महिलांवर अत्याचार व जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गंभीर कलमे लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, दि. 14 मे रोजी अंदाजे 150 ते 200 जणांच्या जमावाने भीमनगर परिसरात घुसून पवित्र बौद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा परिसर, समाजबांधव व महिलांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात दगडफेक व तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून बौद्ध समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याशिवाय, भीमनगर परिसरातील निष्पाप बौद्ध तरुणांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे व F.I.R. No. 303/2026 तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना शासनामार्फत आर्थिक मदत व मोफत वैद्यकीय उपचार द्यावेत, नुकसानग्रस्त वाहनांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) मार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भीमनगर परिसर, पवित्र बौद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच परिसरात तातडीने CCTV कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या निवेदनावर भीमनगर परिसरातील शेकडो बौद्ध बांधव व महिला भगिनींच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
“बौद्ध समाजावरील अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ व निष्पक्ष कारवाई न केल्यास भूम येथे तीव्र मोर्चा आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा आर.पी.आय. (खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला.
यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे, आर.पी.आय. (खरात) गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड,प्रबुद्ध गायकवाड, बाबासाहेब ओव्हाळ, निवृत्ती हौसलमल यांच्यासह अनेक कार्यकर्ते बौद्ध बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांची तात्काळ दुरुस्ती करा; डॉ. प्रतापसिंह पाटील

Next Post

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

Azar R Shaikh

Azar R Shaikh

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन

“आधी ५० हजार भरा, मग आम्ही ५० हजार देतो” ही कर्जमाफी नसून कर्जवसुलीची - आमदार पाटील

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share