• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Azar Shaikh by Azar Shaikh
2026/06/20 10:57 pm
0

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले. मात्र, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाची वाट पाहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.दरम्यान, आज २० जून रोजी या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल लागला. या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या निवासस्थानी उद्या म्हणजेच २१ जून रोजी दुपारी ४ वाजता पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीसंदर्भातील संदेशही कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्याची बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमध्ये ओमराजे शिवसेना

ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत वेग आला होता. या संभाव्य राजकीय घडामोडींना ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देण्यात आले असून, या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ओमराजे निंबाळकर असल्याचे बोलले जात होते. मात्र, ओमराजे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.

“कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणारपवनराजे

निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी घाईघाईत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत. “कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच ते आपली पुढील राजकीय दिशा निश्चित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

श्रीरंग बारणे यांची भेट, चर्चांना आणखी आज

निकालानंतर शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमुळे शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतही निकालानंतर

ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार की पुन्हा ठाकरे गटासोबतच राहणार, याबाबतचा संभ्रम कायम आहे.

धाराशिवसह राज्याचे लक्ष उद्याच्या धाराशिवच्या

राजकारणात ओमराजे निंबाळकर यांचे मोठे वजन मानले जाते. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा परिणाम केवळ धाराशिवपुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणावरही होऊ शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.दरम्यान, उद्या होणाऱ्या बैठकीत ओमराजे निंबाळकर नेमकी कोणती भूमिका घेतात? शिंदे गटात प्रवेश करतात की उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतात? याकडे धाराशिवसह संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

Next Post

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Azar Shaikh

Azar Shaikh

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
राजकारण

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ
राजकारण

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”
राजकारण

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

Next Post
“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

"तुम्ही इकडे या" म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, "सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?"

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

'असावा एक छंद…' ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

'असावा एक छंद…' ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share