• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

तुळजापूर घडणार! अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाचे हब..! जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ऐतिहासिक निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Azar Shaikh by Azar Shaikh
2026/06/14 02:34 pm
0
विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर घडणार अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाचे हबतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता शासकीयअध्यापक आणि शिक्षकेतर ११८ नवीन पदांना मान्यता ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहितीतुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही महानगरांतील विद्यार्थ्यांप्रमाणे अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, नवतंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. या क्षेत्रातील भविष्यातील संधी पाहता त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी आम्ही दृढनिश्चयी असून या दिशेने सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.धाराशिव जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने अनेक वर्षांपासून त्याची मागणी होती.त्याअनुषंगाने आई तुळजाभवानी मातेच्या नावाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करावे यासाठी आपला आग्रह होता व त्या अनुषंगाने आपण याबाबत मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे, उदय सामंत व विद्यमान मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो.आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले आहे.त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह तत्कालीन तसेच विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांचे आभार मानले असून राज्य शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने महाविद्यालयासाठी ३०० प्रवेशक्षमतेनुसार ६० नियमित अध्यापक पदे आणि ५८ शिक्षकेतर पदांसह एकूण ११८ पदांना मान्यता दिली आहे. भविष्यात रिक्त पदे शासकीय नियमानुसार भरली जाणार आहेत. तसेच महाविद्यालयाचे नाव बदलून ‘श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर’ असे करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे तुळजापूर व धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण, आधुनिक सुविधा आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा लाभ मिळणार असून हा निर्णय जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले.जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ऐतिहासिक निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय म्हणजे तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शासकीय महाविद्यालयात रूपांतर होय. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारे तांत्रिक शिक्षण उपलब्ध होणार आहे. तसेच ११८ अध्यापक व शिक्षकेतर पदांना मान्यता मिळाल्याने संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट होईल.सध्या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना नवीन पदभरतीमध्ये सहभागी होता येणार असून जे होणार नाहीत त्यांना संस्थानच्या माध्यमातून वेतन देण्यात येणार आहे.‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दृष्टीकोनातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी, ग्रीन टेक्नॉलॉजी, रिन्यूएबल एनर्जी आणि ईव्ही टेक्नॉलॉजी यांसारखे आधुनिक, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक असून, जिल्ह्याला उच्च शिक्षणाच्या नव्या युगात घेऊन जाण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Previous Post

काँग्रेस भवनात उमेश राजेनिंबाळकर यांचा भव्य पदग्रहण सोहळा; संघटन बळकटीचा निर्धार

Next Post

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

Azar Shaikh

Azar Shaikh

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!
जिल्हा

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक
जिल्हा

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

Next Post

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

ठरलं...! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

"तुम्ही इकडे या" म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, "सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?"

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share