• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव : जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. ६८) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातील प्रचंड निष्काळजीपणा आणि संथ गतीमुळे अखेर एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणावर आमदार कैलास पाटील यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेत संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हा रस्ता अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून कामाच्या ठिकाणी कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. दिनांक ५ मे २०२६ रोजी रात्री, सांजा गावाच्या पुढे पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही संरक्षण कठडे, इशारे, रेडियम चिन्ह किंवा दिशादर्शक फलक नसल्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भंडारवाडी येथील ओम दिलीप अंधारे या युवकाची दुचाकी पुलासाठी खणलेल्या खोल खड्ड्यात जाऊन आदळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.


विशेष म्हणजे, ही पहिली घटना नसून याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एका स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात होऊन ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या सलग घटनांनंतरही ठेकेदार व प्रशासनाने कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना केली नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले आहे.


आमदार कैलास पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही संरक्षण कठडे, इशारे, रेडियम चिन्ह किंवा दिशादर्शक चिन्हांचा वापर करण्यात आलेला नाही, ज्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
तसेच, MSIDC मार्फत सुरू असलेल्या या कामासाठी कोणताही अधिकारी पूर्णवेळ नियुक्त नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यासाठी फक्त एकच कार्यकारी अभियंता नियुक्त असल्यामुळे कामाचा दर्जा राखणे, वेळेत काम पूर्ण करणे आणि प्रत्यक्ष देखरेख करणे अशक्य झाले आहे. संबंधित अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना देऊनही जाणीवपूर्वक अनुपस्थित राहत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.


या सर्व निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप युवकाचा जीव गेला असून हा प्रकार सरळसरळ मनुष्यवधासमान गुन्हा असल्याचे आमदार पाटील यांनी ठामपणे म्हटले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार तसेच कामाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, या प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ठेकेदार व प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त करत “निष्काळजीपणामुळे गेलेल्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.

Previous Post

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share