• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

‘कानफुक्या रील स्टार’ सभापतीचा दुहेरी चेहरा, महिलांच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर सपशेल फेल

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव दिनांक१६(प्रतिनिधी): महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेच्या घोषणा देत सत्तेत आलेल्या धाराशिव नगर परिषदेमध्येच महिलांना  स्वच्छतागृहासाठी आडोसा शोधावा लागत आहे. नगर परिषदेत तब्बल ४१ नगरसेवक असून सत्ताधारी भारतीय जनता  पार्टीचे पालिकेत बहुमत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या ११ महिला नगरसेविका विजयी झालेल्या असून नगराध्यक्षपद देखील  महिलेकडेच आहे. तरीही नगर परिषद इमारतीत महिलांसाठी सुलभ,आणि स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. दररोज विविध कामांसाठी शेकडो महिला नगर परिषदेत येतात. परंतु वॉशरूमची गरज भासल्यास त्यांना सुविधा उपलब्ध होत नाही. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार स्वच्छता समितीच्या कार्यालयाशेजारील एका कोपऱ्यातील खोलीत स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे; मात्र ते ठिकाण आडवळणाला असून कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत. परिणामी, बाहेरून येणाऱ्या महिलांना ती जागा शोधणे कठीण जाते. दरम्यान, नगर परिषदेत इतर विभागांमध्ये हस्तक्षेप करणारे आणि नगराध्यक्ष / अधिकाऱ्यांच्या कानात कुजबुज करून वातावरण तापविणारे म्हणून ओळखले जाणारे ‘कानफुके रील स्टार’ सभापती चौथ्या स्तंभावर आक्षेप घेण्यात पुढे असल्याची चर्चा आहे. मात्र महिलांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही, अशी टीका महिला वर्गातून होत आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा केवळ व्यासपीठापुरत्याच मर्यादित राहणार का? बहुमताची सत्ता असतानाही महिलांसाठी मूलभूत सुविधा का उपलब्ध करून दिल्या जात नाहीत? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नगर परिषद प्रशासनाने तातडीने स्पष्ट दिशादर्शक फलक लावून स्वच्छतागृह सर्वसामान्य महिलांसाठी खुले करावे, तसेच केवळ कर्मचारी वर्गापुरते मर्यादित न ठेवता बाहेरील महिलांनाही सुविधा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. महिला प्रतिनिधित्वाचा अभिमान मिरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता घोषणांपेक्षा कृतीतून संवेदनशीलता दाखविण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Previous Post

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

Next Post

स्थगितीच्या राजकारणात अडकलेली कार्डियाक कॅथलॅब तातडीने सुरू करून जनतेच्या सेवेत द्यावी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

स्थगितीच्या राजकारणात अडकलेली कार्डियाक कॅथलॅब तातडीने सुरू करून जनतेच्या सेवेत द्यावी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share