• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

3 जून 2006… मुंबई लगत असलेल्या कळंबोलीत रस्ते जवळपास ओस… आणि सगळं काही नेहमीसारखं शांत. पण ही शांतता काही क्षणांचीच ठरणार होती, याची कुणालाही कल्पना नव्हती. एक गाडी हळूच पुढे सरकत होती… आत होते प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे विश्वासू चालक समद काझी. अचानक—  दोन सावल्या पुढे आल्या. क्षणात बंदुका उचलल्या गेल्या… आणि ट्रिगर दाबला गेला! धडाधड गोळ्या झाडल्या गेल्या. पहिली गोळी—थेट पवनराजेंच्या डोक्यात. दुसरी—खात्री करण्यासाठी. काही क्षणांतच गाडीत रक्ताचा सडा पडला… आणि पवनराजे खाली कोसळले. पण हल्लेखोर इथे थांबले नाहीत. समद काझी ज्यांनी कदाचित सर्व काही पाहिलं होतं. त्यांनाही लक्ष्य करण्यात आलं. एक गोळी आरपार… आणि काही सेकंदांतच दोघांचाही शेवट झाला. यापाठीमध्ये उद्देश फक्त एकच होता कोणताही साक्षीदार जिवंत राहू नये.


ही घटना केवळ क्षणिक हल्ला नव्हती, तर दीर्घकाळ नियोजन करून राबवलेला कट असल्याचे तपासातून उघड झाले. फेब्रुवारी 2005 पासूनच या हत्येचा कट रचण्यात आला होता. लातूर येथे जाऊन पवनराजे यांच्या घराची रेकी करण्यात आली, त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली आणि योग्य संधीची वाट पाहत तब्बल 16 महिने हा कट सुरू ठेवण्यात आला.  कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे रोजी जाहीर होणार आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणाला तब्बल 20 वर्षे उलटली असून राज्यासह देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.


तपास यंत्रणांच्या माहितीनुसार,पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी 2005 मध्ये लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली त्यानंतर तो धाराशिवला आला मात्र डाव फसल्याने तब्बल 16 महिने कट रचून, पाळत ठेवून 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे हत्या करण्यात आली. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली.

कै पवनराजे यांची हत्या ज्या शस्त्रानी केली होती ती शस्त्र परदेशी बनावटीची होती त्या बंदुकीवर मेड इन युएसए, चायना असे लिहले होते. पवनराजे यांची हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन हल्लेखोर असलेल्या 2 शूटरनी समद काझी यांना सुद्धा एक गोळी मारली, गोळी आरपार गेल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यु झाला. पवनराजे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी डोक्यात लागली तर काझी यांच्यावर एक गोळी झाडली.

राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे. माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे 9 जण दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत.

एकामागून एक असे 3 खोटे गुन्हे नोंद होत असल्याने पारसमल जैन याने मुलगी वर्षा हिला सीबीआयला पत्र लिहून हत्याकांडाची माहिती दिली, त्यानुसार तिने 27 एप्रिल 2009 सीबीआयला पत्र दिले. डॉ पाटील यांच्या वतीने काही शब्द व आश्वासन देऊन वाऱ्यावर सोडले, शिवाय उलट खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तो फुटला व खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा केला. मुंबईचे तत्कालीन सह पोलिस आयुdक्त राकेश मारिया यांच्यासह त्यांच्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत. अवैध कोठडीत ठेवणे, कबुली दिलेली असताना ती लपवून ठेवणे, खोट्या गुन्ह्यात अडकवणे यासह अन्य आरोप जैनने कोर्टात केले, त्यावर कोर्ट काय म्हणते याकडे लक्ष लागले आहे.

सीबीआयचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर व त्यांच्या टीमची भुमिका महत्वाची राहिली. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड हे तर डॉ पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक, ऍड रोहित मालपाणी हे तर इतरांच्या वतीने ऍड नेहा सुळे बाजु मांडत आहेत. प्रकरणातील पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असून त्याच्या जबाबाभोवती संपूर्ण खटला फिरत आहे. जैन यांनी सीबीआयला पत्र देत हत्याकांडाबाबत माहिती दिल्यानंतर तपासाला गती मिळाली होती. मात्र, त्यांनी तपास यंत्रणांवर अवैध कोठडी, जबरदस्तीने कबुली घेणे आणि खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे आरोपही न्यायालयात केले आहेत.
बचाव पक्षाकडून सुमारे 1250 पानांचे लेखी म्हणणे सादर करण्यात आले असून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता या बहुचर्चित खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून 14 मे रोजी न्यायालयाचा निर्णय जाहीर होणार आहे.

Previous Post

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

Next Post

कोकणातील हाफुस प्रमाणे जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादकाना आर्थिक मदत द्यावी; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

क्राईम

पत्रकार सुनील ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर, ॲड. विशाल साखरे यांचा जोरदार युक्तिवाद

क्राईम

“बनावट मीडीयाचा पर्दाफाश”, धाराशिव नगरपालिका निवडणुकीत फेक एक्झिट पोल प्रकरणात अखेर धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल…

क्राईम

बनावट एक्झिट पोल प्रकरणात प्रशासनाचे संशयास्पद मौन— आदेश असूनही FIR नाही! धाराशिव प्रशासनावर जनतेचा रोष

Next Post

कोकणातील हाफुस प्रमाणे जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादकाना आर्थिक मदत द्यावी; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share