• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

पत्रकार सुनील ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर, ॲड. विशाल साखरे यांचा जोरदार युक्तिवाद

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव : तुळजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या खंडणी प्रकरणात पत्रकार श्री. सुनील ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुनील ढेपे यांच्या वतीने जामीन अर्जावर ॲड. विशाल साखरे यांनी केलेला सखोल व प्रखर युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
सदर प्रकरणात रिमांडच्या पहिल्या टप्प्यात पोलिसांनी १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र ॲड. विशाल साखरे यांच्या युक्तिवादामुळे न्यायालयाने केवळ दोन दिवसांचीच पोलीस कोठडी मंजूर केली. त्यानंतर पुढील रिमांडवेळी पुन्हा १० दिवसांची कोठडी मागण्यात आली असता, ही मागणी अवास्तव असून त्यासाठी ठोस कारणे नसल्याचा युक्तिवाद ॲड. साखरे यांनी केला.
हा युक्तिवाद मान्य करत माननीय न्यायालयाने पोलिस प्रशासन व सरकारी वकिलांना अवास्तव कोठडी मागणीबाबत चांगलेच सुनावले. तसेच पोलीस कोठडीसाठी स्पष्ट व संयुक्तिक कारणे मांडणे आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने केवळ एक दिवसांचीच पोलीस कोठडी मंजूर केली.
जामीन सुनावणीदरम्यान ॲड. विशाल साखरे यांनी खंडणी मागितल्याचा आरोप पूर्णतः निराधार असल्याचा ठोस युक्तिवाद मांडला. फिर्यादीच्या सांगण्यावरून तिसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात ५,००० रुपये भरल्याचा दावा खोटा असून, या व्यवहाराशी सुनील ढेपे यांचा कोणताही थेट आर्थिक संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले देत, राजकीय हेतूने तसेच ड्रग्स प्रकरणातील बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे द्वेषातून सदर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. हे सर्व मुद्दे ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने सुनील ढेपे यांची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. विराज जगदाळे (विशेष सहकार्य), ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. संकेत गोरे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. अमित गोळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी तसेच रोहित लोमटे व महेश पवार यांनी सहकार्य केले.

Previous Post

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

Next Post

खामसवाडी जिल्हा परिषद गटात शंतनू पायाळ यांची विकासकेंद्री मोर्चेबांधणी सुरू

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

Next Post

खामसवाडी जिल्हा परिषद गटात शंतनू पायाळ यांची विकासकेंद्री मोर्चेबांधणी सुरू

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

रोहन मोरे यांचा अपक्ष अर्ज; बंडखोरी कायम राहणार की वरिष्ठ नेत्यांचे ऐकणार?

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share