• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक

Azar R Shaikh by Azar R Shaikh
2026/07/29 02:44 pm
0
काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक

धाराशिव | प्रतिनिधीभाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीपासून रोखण्यात आल्याचा आरोप आता धाराशिव भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. या घटनेनंतर पक्षातील नाराजी उफाळून आली असून, निष्ठावंत कार्यकर्ते आणि आजी-माजी पदाधिकारी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, धाराशिवमधील पक्षांतर्गत घडामोडी, कार्यकर्त्यांचा वाढता असंतोष, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवरील कथित अन्याय आणि स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर निवेदन वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपची जुनी फळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

“हुकूमशाहीला आता उत्तर मिळणार”

अनिल काळे यांच्या कथित अपमानानंतर अनेक जुने कार्यकर्ते उघडपणे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत थेट आपली भूमिका पोहोचविल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नेतृत्वाच्या कार्यशैलीमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे.

“३५ वर्षांची निष्ठा… आणि मोबदला अपमान?”

ॲड. अनिल काळे यांनी आरोप केला की, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच त्यांना मंत्र्यांच्या भेटीपासून रोखले. गेली ३५ वर्षे पक्षासाठी सातत्याने काम करूनही अशी वागणूक मिळाल्याची खंत व्यक्त करत, “आम्ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत; कुणाचे गुलाम नाही,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला. हा संपूर्ण प्रकार पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत नेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

अनिल काळे यांनी स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला दुय्यम स्थान देणे, जुन्या पदाधिकाऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणे, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे आणि पक्षाची मूळ विचारधारा बाजूला पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.याशिवाय, काही अवैध प्रवृत्तींना कथित संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मेघ पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टचाही उल्लेख करत, या सर्व बाबी वरिष्ठ नेतृत्वासमोर पुराव्यांसह मांडल्या जाणार असल्याचा दावा त्यांनी केला.

“राणा पाटील पक्षापेक्षा मोठे नाहीत”

“कार्यकर्त्यांचा सातत्याने अपमान, त्यांचे योगदान कमी लेखणे आणि पक्षात एकतर्फी कारभार चालवणे आता सहन केले जाणार नाही. राणा पाटील पक्षापेक्षा मोठे नाहीत. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या संयमाचा अंत झाला असून, या वागणुकीची मोठी राजकीय किंमत पक्षाला मोजावी लागू शकते,” असा इशारा अनिल काळे यांनी दिला.या संपूर्ण घडामोडींमुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला असून, राज्य नेतृत्व या प्रकरणात हस्तक्षेप करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

Next Post

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

Azar R Shaikh

Azar R Shaikh

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!
जिल्हा

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

Next Post
“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share