• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

कौडगाव एमआयडीसीत लॉजिस्टिक पार्कची मागणी म्हणजे अज्ञान – भाजप

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची पत्रकार परिषद

धाराशिव- कौडगाव एमआयडीसी येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या मागणीवरून भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत धाराशिवचे आमदार आणि खासदार यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमदार पाटील आणि खासदार  यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कौडगाव येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्याची मागणी केली होती. या मागणीचे विकासाच्या दृष्टीने भाजपाने स्वागत केले असले तरी, निवडलेले ठिकाण चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी आक्षेप नोंदवला. पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यासह नितीन काळे, संताजी चालुक्य, ॲड. अनिल काळे, सतीश दंडनाईक, युवा मोर्चाचे राजसिंहा राजेनिंबाळकर आणि अमित शिंदे हे उपस्थित होते. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले की, लॉजिस्टिक पार्कची मागणी स्वागतार्ह आहे, परंतु त्यामागील अभ्यासाचा खुलासा करणे आवश्यक आहे. तसेच, नितीन काळे यांनी स्पष्ट केले की, रेल्वे, महामार्ग, बंदर किंवा विमानतळासारख्या वाहतूक सुविधा सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारणे योग्य ठरते. तसेच कौडगाव एमआयडीसी ही जागा टेक्निकल टेक्सटाईल हबसाठी नियोजित असून, मागील महिन्यात 449 एकरसाठी टेंडर काढले गेले आहे. तसेच, 17 कोटींची विकासकामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत कौडगाव येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा आग्रह हास्यास्पद असल्याचे नितीन काळे यांनी म्हटले. याबरोबरच वडगाव एमआयडीसी आणि म्हाळुंब्रा येथे लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य भौगोलिक आणि वाहतूक सुविधा उपलब्ध असल्याचे नमूद केले. चेन्नई-सूरत महामार्ग म्हाळुंब्राजवळून जात असतानाही कौडगावचा आग्रह धरला जाणे संशयास्पद असल्याची टीका नितीन काळे यांनी केली. तर दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, लॉजिस्टिक पार्कला विरोध नाही, परंतु कौडगावच्या सुसंगततेचा शास्त्रशुद्ध अभ्यास आवश्यक आहे. मागण्या संवादातून आणि तर्कसंगत असाव्यात, अन्यथा त्या दिशाभूल करणाऱ्या ठरतील. कौडगाव हे ठिकाण तांत्रिकदृष्ट्या लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Previous Post

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट? धाराशिव पोलीस करणार दूध का दूध – पाणी का पाणी

Next Post

ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटी 2025 च्या अध्यक्षपदी पुन्हा खलील सय्यद

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटी 2025 च्या अध्यक्षपदी पुन्हा खलील सय्यद

पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश, 79,880 शेतकऱ्यांना 86 कोटींची मदत मिळणार..!

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share