गेल्या काही दिवसांपूर्वीच धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मोठा ट्रेंड सुरू केला होता. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांना देखील ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरचं उत्तर दिले होते.. दरम्यान मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअपवर रिपोर्ट मारून तो बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा निंबाळकर यांना उत्तर दिले जात आहे. अभिजीत पतंगे यांनी ओमराजे निंबाळकर यांना दिवचकू असून, “माझं व्हाट्सअप हॅक करण्यात आले, माझे व्हाट्सअप ब्लॉक करण्यात आले”. तुम्ही छाती बडवून ओरडून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यासाठी सांगत होतात. विरोधक आणि त्यांची सोशल मीडिया टीम अमुक तमुक. ते फक्त एकच झालं बाकीच्या 11 कारणाचं काय की ज्यामुळे तुमचं व्हाट्सअप ब्लॉक होऊ शकत किंवा सस्पेंड होऊ शकत…. असं म्हणतं निशाणा साधला आहे.
यामुळे व्हाट्सअप ब्लॉक किंवा पडू शकते बंद अभिजीत पतंगे यांनी सांगितलं कारण?
1. अनधिकृत ॲप्स – GBWHATSAPP, WHATSAPP PLUS सारखी तृतीय-पक्ष ॲप्स वापरणे.
2. स्क्रॅपिंग – वापरकर्त्यांची माहिती (नंबर, फोटो, स्टेटस) अनधिकृतपणे गोळा करणे.
3. बल्क मेसेजिंग – बॉट्स किंवा ऑटोमेशनने मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवणे.
4. वारंवार रिपोर्ट / ब्लॉक – अनेक लोकांनी तुमच्या नंबरला रिपोर्ट किंवा ब्लॉक केले.
5. स्पॅम मेसेजेस – अज्ञात लोकांना वारंवार अनावश्यक संदेश पाठवणे.
6. खोटी माहिती – चुकीची माहिती, अफवा किंवा दिशाभूल करणारे मेसेज पाठवणे.
7. गोपनीयतेचे उल्लंघन – दुसऱ्यांचे फोटो, लोकेशन, माहिती संमतीशिवाय शेअर करणे.
8. फसवणूक – स्कॅम लिंक्स, बनावट ऑफर्स, पैशांची फसवणूक करणे.
9. धोकादायक कंटेंट – दहशतवाद, हिंसा, द्वेष, बाल शोषण किंवा बेकायदेशीर साहित्य शेअर करणे.
10. ग्रुपचा गैरवापर – अज्ञात लोकांना जबरदस्तीने ADD करणे किंवा स्पॅमिंग ग्रुप्स.
11. कायद्याचे उल्लंघन – स्थानिक कायदे मोडणारा कंटेंट/क्रिया करणे.
12. संशयास्पद क्रिया – सतत नंबर बदलणे, सिम-स्वॅप, हॅकिंगसारख्या हालचाली.
यामुळे व्हाट्सअप बंद किंवा हॅक पडते असं पतंगे यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.










