• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर ओमराजे निंबाळकर संतप्त, फेसबुक पोस्ट करत केली ‘ही’ मागणी

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

हॅलो धाराशिव – फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा ताई मुंडे यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना राज्यभरात खळबळ उडवणारी ठरली आहे. या प्रकरणावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भूमिका देखील आपली भूमिका व्यक्त केली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या फेसबुकवर भावनिक पोस्ट करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?

निंबाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की —
“पोलीस अधिकाऱ्याचा मानसिक छळ सहन न झाल्याने डॉ. संपदा ताई मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं समोर आलं असून, हे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करतं. पोलिसच अन्याय करू लागले तर महिलांनी न्याय मागायचं कुठं? या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. डॉ. संपदा ताई मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”



या पोस्टनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, नेटिझन्सनीही या घटनेवर कठोर शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. डॉ. मुंडे यांच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर यावे आणि दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.




नेमके प्रकरण काय?



फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने आपल्या तळहातावर सुसाइड नोट लिहिल्याचे समोर आले असून, त्यात तिने दोन पोलिस अधिकाऱ्यांवर बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.



प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक बदने यांच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आणि पोलिस अधिकारी बनकर यांनी सलग चार महिने मानसिक छळ केल्याचा उल्लेख केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.



दरम्यान, महिलेच्या हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Previous Post

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा गोड बातमी : भूसंपादनासाठी १८ कोटी उपलब्ध

Next Post

तुळजापूर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार! महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढणार तुळजापूरची निवडणूक – खासदार निंबाळकर

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

Next Post

तुळजापूर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार! महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढणार तुळजापूरची निवडणूक - खासदार निंबाळकर

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासा, शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश! जनतेची ६० कोटींची बचत!
- आमदार राणाजगजीतसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share