धाराशिव :टिपू सुलतान जयंतीनिमित्त अजहर पठाण यांच्या वतीने अन्नपूर्णा येथे अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले. सामाजिक ऐक्य, सेवा आणि परंपरा जपणारा हा उपक्रम स्थानिक परिसरात विशेष उत्साहात पार पडला.
या उपक्रमाची विशेष नोंद म्हणजे अजहर पठाण यांच्या पत्नी या वार्ड क्रमांक 18 मधून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. लोकसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी याची जाण ठेवत त्यांनी या अन्नछत्रात विशेष सहभाग नोंदवला. शेकडो नागरिकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला.
अन्नछत्रामध्ये उपस्थितांनी पठाण दांपत्यांच्या सामाजिक कामाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजातील ऐक्य व सौहार्द वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले.










