धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत तेर गटातून आम आदमी पार्टीकडून रत्नमाला पिंपळे यांनी उमेदवारी दाखल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांचा प्रचार वेगाने सुरू असून, गावागावात नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
रत्नमाला पिंपळे आणि त्यांचे पती तानाजी पिंपळे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. शैक्षणिक उपक्रम, स्वच्छता मोहिमा, तसेच तब्बल 2000 झाडांचे वृक्षसंवर्धन करून पर्यावरणपूरक विकासाचा संदेश त्यांनी दिला आहे. महिलांसाठी मार्गदर्शन, सायकल वाटप, बचतगट महिलांना योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस बिलासह विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलन करून आवाज उठवला आहे.
‘स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार’ या भूमिकेवर रत्नमाला पिंपळे मैदानात उतरल्या असून, त्यामुळे तेर गटातील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.










