• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“फसवे दिखावे आणि खोटं राजकारण!” अभिजीत पतंगेंचा खासदार ओमराजेंवर जोरदार निशाणा

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

Hello Dharashiv  Desk| हॅलो धाराशिव डेस्क

Hello Dharashiv| भाजपचे शहर सरचिटणीस अभिजीत पतंगे यांनी पुन्हा धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कार्टूनच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी सत्य माहिती लपवून ठेवत खोटी माहिती जनतेसमोर आणली असा आरोप करत अभिजीत पतंगे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “अर्धवटराव आणि त्यांचे फसवे दिखावे” असं पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीचे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या घराचे झालेले नुकसान , जनावरांचे नुकसान झालेले असतानाही प्रशासनाने एक गुंठाही जमिनीचे नुकसान झाले नाही असा अहवाल दिला असल्याचं निंबाळकर यांनी व्हिडिओद्वारे म्हटलं होतं.


ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले?


धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीचे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या घराचे झालेले नुकसान , जनावरांचे नुकसान झालेले असतानाही प्रशासनाने एक गुंठाही जमिनीचे नुकसान झाले नाही असा अहवाल दिला असल्याचं निंबाळकर म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याबाबतीत जो अहवाल सरकारकडे जाणार आहे, यासंदर्भात काल लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. खरवडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करत असताना तुळजापूर तालुक्यातील एक गुंठाही जमीन खरवडून गेली नाही अशाप्रकारे प्रशासनाचे म्हणणे आहे. असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटल आहे.


तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तिथल्या जमिनी खरवडून गेल्या – निंबाळकर


एक जून 2025 ते  आत्तापर्यंत खरडून गेलेल्या जमिनीचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. तुळजापूर तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची एक गुंठा ही जमून खरवडून गेली नाही अशा पद्धतीने प्रशासनाने घोषवाऱ्यामध्ये म्हटलं आहे असं ओमराजे निंबाळकर यांनी घोषवाऱ्याची प्रत दाखवत म्हटलं. तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तिथल्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. असं असतानाही प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांची संख्या शून्य. बाधित गावांची संख्या शून्य. खरवडून गेलेल्या जमिनीची संख्या शून्य असून निधीची मागणी देखील शून्य असल्याचं  प्रशासनानं दाखवले आहे असं निंबाळकर यांनी म्हटलं. ओमराजे यांनी दाखवलेला घोषवारा हा खोटा असून, घोषवाराची प्रत पतंगे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पतंगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रतमध्ये निधीच्या मागणी सहित खरवडून गेलेल्या जमिनीचे देखील माहिती आहे.

पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून निंबाळकर यांच्यावर सडकून टीका..

दरम्यान, अभिजीत पतंगे यांनी म्हटलं की, निंबाळकर यांनी व्हिडिओद्वारे दिलेली माहिती खोटी असून, पंचनाम्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे असं दाखवण्यात आलं आहे असं म्हटलं आहे. “अर्धवटराव आणि त्यांचे फसवे दिखावे” म्हणत निंबाळकर यांच्यावर पतंगे यांनी टीका केली. अगदी सवयीप्रमाणे, धाराशिवचे खोटारडे खासदार पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल करताना पकडले गेले! असल्याचा आरोप पतंगे यांनी केला केला. खोटं सांगणं, खोटं दाखवणं आणि पुन्हा जनतेला भुलवण हीच ओमराजांची राजकीय परंपरा झाली आहे! धाराशिवच्या जनतेला आता फसवणूक नको उत्तर हवय अशी मागणी देखील पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून केली आहे.

Previous Post

धाराशिव नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीकडे (शरद पवार) पक्षाकडे प्रबळ दावेदार – प्रतापसिंह पाटील यांचा दावा

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस, आज होणार आरक्षण  जाहीर.. वाचा संपूर्ण बातमी

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस, आज होणार आरक्षण  जाहीर.. वाचा संपूर्ण बातमी

मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर...! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

निमजाई न्युएरा प्रा. लि., धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share