Hello Dharashiv Desk| हॅलो धाराशिव डेस्क
Hello Dharashiv| भाजपचे शहर सरचिटणीस अभिजीत पतंगे यांनी पुन्हा धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कार्टूनच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी सत्य माहिती लपवून ठेवत खोटी माहिती जनतेसमोर आणली असा आरोप करत अभिजीत पतंगे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “अर्धवटराव आणि त्यांचे फसवे दिखावे” असं पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीचे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या घराचे झालेले नुकसान , जनावरांचे नुकसान झालेले असतानाही प्रशासनाने एक गुंठाही जमिनीचे नुकसान झाले नाही असा अहवाल दिला असल्याचं निंबाळकर यांनी व्हिडिओद्वारे म्हटलं होतं.

ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले?
धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीचे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या घराचे झालेले नुकसान , जनावरांचे नुकसान झालेले असतानाही प्रशासनाने एक गुंठाही जमिनीचे नुकसान झाले नाही असा अहवाल दिला असल्याचं निंबाळकर म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याबाबतीत जो अहवाल सरकारकडे जाणार आहे, यासंदर्भात काल लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. खरवडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करत असताना तुळजापूर तालुक्यातील एक गुंठाही जमीन खरवडून गेली नाही अशाप्रकारे प्रशासनाचे म्हणणे आहे. असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटल आहे.

तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तिथल्या जमिनी खरवडून गेल्या – निंबाळकर
एक जून 2025 ते आत्तापर्यंत खरडून गेलेल्या जमिनीचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. तुळजापूर तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची एक गुंठा ही जमून खरवडून गेली नाही अशा पद्धतीने प्रशासनाने घोषवाऱ्यामध्ये म्हटलं आहे असं ओमराजे निंबाळकर यांनी घोषवाऱ्याची प्रत दाखवत म्हटलं. तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तिथल्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. असं असतानाही प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांची संख्या शून्य. बाधित गावांची संख्या शून्य. खरवडून गेलेल्या जमिनीची संख्या शून्य असून निधीची मागणी देखील शून्य असल्याचं प्रशासनानं दाखवले आहे असं निंबाळकर यांनी म्हटलं. ओमराजे यांनी दाखवलेला घोषवारा हा खोटा असून, घोषवाराची प्रत पतंगे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पतंगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रतमध्ये निधीच्या मागणी सहित खरवडून गेलेल्या जमिनीचे देखील माहिती आहे.
पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून निंबाळकर यांच्यावर सडकून टीका..
दरम्यान, अभिजीत पतंगे यांनी म्हटलं की, निंबाळकर यांनी व्हिडिओद्वारे दिलेली माहिती खोटी असून, पंचनाम्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे असं दाखवण्यात आलं आहे असं म्हटलं आहे. “अर्धवटराव आणि त्यांचे फसवे दिखावे” म्हणत निंबाळकर यांच्यावर पतंगे यांनी टीका केली. अगदी सवयीप्रमाणे, धाराशिवचे खोटारडे खासदार पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल करताना पकडले गेले! असल्याचा आरोप पतंगे यांनी केला केला. खोटं सांगणं, खोटं दाखवणं आणि पुन्हा जनतेला भुलवण हीच ओमराजांची राजकीय परंपरा झाली आहे! धाराशिवच्या जनतेला आता फसवणूक नको उत्तर हवय अशी मागणी देखील पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून केली आहे.











