हॅलो धाराशिव | येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मोठ्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहेत. मात्र,
राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये असंतोषाचे सूर आता उघडपणे दिसून येऊ लागले आहेत. त्याचे कारण म्हणजे, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठं विधान केलं आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, ” भाजप जर एकट लढायला तयार असेल, तर शिवसेना देखील एकट लढायला तयार आहे” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या या विधानावरून जिल्ह्यात महायुती होणार की नाही? याची चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, कदाचित महायुती जरी झाली तर ते आपला धर्म पाळतात की नाही? याची देखील शंका वाटू लागली आहे.
नेमकं काय म्हणाले पालकमंत्री प्रताप सरनाईक?
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रताप सरनाईक यांना विचारला गेलेला प्रश्न असा होता, की “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. भाजपच्या मेळाव्यात आमदार राणाजगजीसिंह पाटील आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतंत्र लढण्याच्या सूचना त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत”, यावर तुमचं काय ठरलं आहे? या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, की,
राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी महायुती लढेल असा निर्णय आमचा राज्यस्तरीय स्तरावर झाला आहे. तसे निर्देश पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिले आहेत. मात्र, स्थानिक स्तरावर काही निर्णय होत असतील तर ते निर्णय आम्हाला मान्य करावे लागतील. मात्र निर्णय त्यांनी घ्यावेत. परंतु, निर्णय घेत असताना विरोधकांना म्हणजेच महाविकासआघाडीला याचा जर फायदा होत असेल तर, त्यांनी त्याचा विचार करून निर्णय घ्यावा.
एकत्रित लढलो तर आपला फायदा होईल – प्रताप सरनाईक
“भाजप एकट लढायला तयार असेल तर शिवसेना देखील एकट लढेल” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.. मात्र असं लढण्यापेक्षा आपण एकत्रित लढलो तर आपला फायदा होईल”. असेही सरनाईक यांनी म्हटलं.











