• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मोठी बातमी; गुंड निलेश घायवळसोबत फोटो व्हायरल झालेल्या ‘त्या’ सरपंचावर गुन्हा दाखल..

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

शासकीय कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे दिल्याचा प्रकार उघड

ठेकेदार रमेश कोकाटे (रा. निपाणी, ता. भूम) यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात ठेकेदार-गुंड संबंधांवरून चर्चेला उधाण

हॅलो धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. गुंड निलेश घायवळ यांच्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ठेकेदारावर आता गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे दिल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर, माजी सरपंच आणि ठेकेदार रमेश कोकाटे (रा. निपाणी, ता. भूम) यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघड


या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेकराज यांनी फिर्याद दिली आहे. बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा या तिन्ही विभागातील कंत्राट मिळवण्यासाठी कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले आहे. सदर प्रकरणाने जिल्हा परिषद व शासकीय यंत्रणेत खळबळ माजली आहे. कोकाटे यांनी खोटी माहिती व बनावट दस्तऐवज सादर करून शासकीय निधीवर डोळा ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे.

धाराशिव जिल्ह्यात ठेकेदार-गुंड संबंधांवरून चर्चेला उधाण


दरम्यान, रमेश कोकाटे यांच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी निपाणी येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या गोंधळ प्रकरणातही निलेश घायवळ आणि रमेश कोकाटे यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते. या सर्व घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यात ठेकेदार-गुंड संबंधांवरून चर्चेला उधाण आले आहे. पोलिस तपास सुरू असून, आणखी मोठे घोटाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या फेसबुक पोस्टने मोठा संभ्रम, “अडथळ्यांची शर्यत स्वतःच लावून, शेवटी श्रेयाचं पारितोषिक घेण्याचं हे नाटक” कधी थांबणारं?

Next Post

धाराशिवमध्ये महायुतीत खळबळ!  पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने महायुती होणार की नाही यावरून संभ्रम? वाचा सविस्तर बातमी!

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

Next Post

धाराशिवमध्ये महायुतीत खळबळ!  पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने महायुती होणार की नाही यावरून संभ्रम? वाचा सविस्तर बातमी!

मोठी बातमी! शिवभवानी शिल्प ; आणखी बारकावे तपासले जाणार, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची राज्याच्या कला संचालनालयाला भेट

मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्यात एकाच पत्त्यावर ३७ मतदार, शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप..!

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share