• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या फेसबुक पोस्टने मोठा संभ्रम, “अडथळ्यांची शर्यत स्वतःच लावून, शेवटी श्रेयाचं पारितोषिक घेण्याचं हे नाटक” कधी थांबणारं?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

2024-25 वर्षाच्या 268 कोटी पैकी फक्त 22 कोटींच्या कामावरीलचं स्थगिती उठवली गेली

246 कोटींच्या कामाच्या पुन्हा एकदा प्रशासकीय मान्यता घ्यावा लागणार

“हातात अडथळ्याचा झेंडा, पण ओठांवर श्रेयाचं गाणं हा प्रकार धाराशिवमध्ये रोजचा झालाय!”

हॅलो धाराशिव | Hello Dharashiv

भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी  फेसबुकवर “धाराशिव जिल्हा नियोजन समिती: २०२४-२५ च्या स्थगित शिल्लक निधी सह २०२५-२६ च्या निधीचा योग्य कामांसाठी वापरास मान्यता” मिळाली असल्याची पोस्ट केल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे जिल्हा नियोजन समिती 2024-25 वर्षाच्या 268 कोटी पैकी फक्त 22 कोटींच्या कामावरीलचं स्थगिती उठवली गेली असुन कार्यारंभ आदेश न दिलेल्या सर्व कामांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता रद्द झाल्याने जवळपास 246 कोटींच्या कामाच्या पुन्हा एकदा प्रशासकीय मान्यता घ्यावा लागणार आहेत. मात्र, यातील एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, 246 कोटीतील काही कामे गरज असल्यासचं 2025-26 मध्ये पुन्हा प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहेत. परंतु, कोणत्या कामाची गरज आहे? हे ठरवणारं कोण? गरजेचे निकष काय ? त्या निर्णय प्रक्रियेत विरोधी पक्षाच्या खासदार, आमदार यांना स्थान मिळेल का ?  असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.


भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारी नंतरचं मिळाली होती स्थगिती


जिल्हा नियोजन समितीच्या 24-25 वर्षाच्या 268 कोटी रुपयांच्या कामांना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या कामाला स्थिगिती दिली होती. तेव्हा पासुन जवळपास 6 महिने ही कामे प्रलंबित राहिल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. आता पुन्हा निधी वाटपाचे सुत्र ठरल्याने ‘तोडगा’  जरी निघाला असला, तरी स्थगिती आणणारेचं स्थगिती उठल्याचा आनंद साजरा करत असल्याने “हातात अडथळ्याचा झेंडा, पण ओठांवर श्रेयाचं गाणं हा प्रकार धाराशिवमध्ये रोजचा झालाय!” असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या फेसबुक पोस्टने मोठा संभ्रम निर्माण झाला असून,  “अडथळ्यांची शर्यत स्वतःच लावून, शेवटी श्रेयाचं पारितोषिक घेण्याचं हे नाटक” कधी थांबणारं? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.



जिल्हाधिकारी तथा समिती सचिव यांनी सुचविलेली कामे सुरक्षित


दरम्यान, आता 22 कोटींच्या 106 कामांची स्थगिती उठवली आहे. 22 कोटींची 106 कामे ही जिल्हाधिकारी तथा समिती सचिव यांनी सुचवली होती ती कामे राजकीय वादापासून सुरक्षित ‘कोट्यात’ आहेत. मात्र, इतर 246 कोटींच्या कामाचे काय? यावर, पुन्हा राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान,  2024-25 मध्ये वितरीत करण्यात आलेला निधी 31 मार्च 2026 पर्यंत खर्च करणे आवश्यक राहील असे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या आदेशात नमुद करण्यात आला आहे. मात्र, हा निधी एवढ्या कमी कालावधीत खर्च करणे अत्यंत अवघड काम आहे. कारण, प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी लागणारा वेळ आणि येत्या काही दिवसांमध्ये निवडणूकासाठी लागणारी आचारसंहिता यामध्ये ही कामे थांबू शकतात.

Previous Post

मोठी बातमी: जिल्हा नियोजन समितीच्या ‘या’ कामांची स्थगिती उठली, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पोस्ट करत दिली माहिती..

Next Post

मोठी बातमी; गुंड निलेश घायवळसोबत फोटो व्हायरल झालेल्या ‘त्या’ सरपंचावर गुन्हा दाखल..

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!
जिल्हा

‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’; ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’… नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये बॅनरबाजीचा स्फोट!

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
राजकारण

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ
राजकारण

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”
राजकारण

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक
जिल्हा

काळे अपमान प्रकरणाने भाजपमध्ये खळबळ; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसमोर वाचणारं तक्रारींचा पाढा, जुने पदाधिकारी आक्रमक

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

Next Post

मोठी बातमी; गुंड निलेश घायवळसोबत फोटो व्हायरल झालेल्या 'त्या' सरपंचावर गुन्हा दाखल..

धाराशिवमध्ये महायुतीत खळबळ!  पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने महायुती होणार की नाही यावरून संभ्रम? वाचा सविस्तर बातमी!

मोठी बातमी! शिवभवानी शिल्प ; आणखी बारकावे तपासले जाणार, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची राज्याच्या कला संचालनालयाला भेट

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share