• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव – पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आज धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारत लोकशाहीला काळीमा फासल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पत्रकारांना दारातच रोखण्यात आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले. या निर्णयाचा तीव्र निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. “जर काही लपवायचे नव्हते, तर पत्रकारांना प्रवेश का नाकारला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.


मात्र, सभागृहात या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष यांनी मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “तुतारी आणि कमळ एकाच तालावर?” अशी कुजबुज सभागृहाबाहेर रंगली. सभा संपल्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप केले. “लोकशाहीत चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या माध्यमांना बाहेर ठेवणे म्हणजे पारदर्शकतेची भीती,” असे म्हणत त्यांनी सभेत नेमके काय घडले याचा संपूर्ण पाडा पत्रकारांसमोर वाचून दाखवला.


विरोधकांच्या मते, सभेत अनेक संवेदनशील विषयांवर चर्चा झाली. मात्र, त्या चर्चेची माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये म्हणूनच पत्रकारांना रोखण्यात आले. “जनतेच्या पैशांचा हिशोब देताना घाबरायचे कारण काय?” असा सवाल करत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यात आली.धाराशिवच्या राजकारणात या घटनेमुळे नवे वादळ उठण्याची चिन्हे आहेत. पत्रकारांना प्रवेश नाकारण्यामागील नेमके कारण काय, याचे स्पष्टीकरण सत्ताधाऱ्यांकडून अद्याप देण्यात आलेले नाही. दरम्यान, या निर्णयाविरोधात पुढील आंदोलनाचा इशारा विरोधकांनी दिला आहे. विशेष म्हणजे, सभागृहात पत्रकारांना प्रवेश नाकारण्यासारख्या गंभीर विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पूर्णपणे गप्प बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही ठोस भूमिका त्यांनी मांडली नाही. त्यामुळे “तुतारी आणि कमळ एकीच आहे का?” असा सवाल राजकीय वर्तुळात जोर धरू लागला आहे.
भारतीय जनता पक्षच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठिंबा देत तुतारीवाल्यांनी मौन धारण केल्याचा आरोप विरोधकांनी केला. “लोकशाहीवर घाला घातला जात असताना गप्प राहणे म्हणजे मूकसंमतीच,” असा घणाघाती आरोप करत विरोधकांनी तुतारीवाल्यांनाही लक्ष्य केले.


“पत्रकारांना बाहेर ठेवून सभागृहात काय शिजत होते, याची भीती कोणाला आहे? आणि जर पारदर्शकता असती, तर तुतारीवाल्यांनी आवाज का उठवला नाही?” असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी ‘तुतारी- कमळ मैत्री’वर थेट निशाणा साधला.

Previous Post

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे यांची दमदार एन्ट्री; निवडणूक चुरशीची!

Next Post

‘कानफुक्या रील स्टार’ सभापतीचा दुहेरी चेहरा, महिलांच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर सपशेल फेल

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

राजकारण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

राजकारण

“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

राजकारण

मल्हार पाटीलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची ‘औकात’ काढत केली जोरदार टीका! म्हणाले….

Next Post

‘कानफुक्या रील स्टार’ सभापतीचा दुहेरी चेहरा, महिलांच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर सपशेल फेल

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share