• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

नियम धाब्यावर, निधी वाटपात प्रचंड अनियमितता, आमदार कैलास पाटील यांची चौकशीची मागणी, शासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना मागितला स्वयंस्पष्ट अहवाल

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0




धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये दिलेल्या प्रशासकीय मान्यता व निधी वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी थेट नियोजन विभागाच्या सचिवांना सविस्तर पत्र पाठवले आहे. या पत्रामुळे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्हा नियोजन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


आमदार कैलास पाटील यांनी नियोजन विभागाच्या सचिवांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, धाराशिव यांनी विविध विभागांकडून आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने कामांना प्रशासकीय मान्यता देताना आर्थिक शिस्तीचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवले आहेत. शासनाच्या नियमानुसार मंजूर अर्थसंकल्पाच्या दीडपट मर्यादेपर्यंतच प्रशासकीय मान्यता देणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक पट  निधीला मंजुरी देण्यात आली आहे.


या संदर्भात सर्वाधिक धक्कादायक उदाहरण म्हणजे सामाजिक वनीकरण विभागाचे आहे. १०० लाख रुपयांची तरतूद असताना तब्बल ६३४.५५ लाखांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, ६३६.४७ लाख रुपयांचा निधी प्रत्यक्षात वितरीत करण्यात आला आहे. या आकड्यांमुळे निधी मंजुरी आणि वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.
याशिवाय, पर्यटन विकासाच्या नावाखालीही नियमबाह्य निर्णय घेतल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.

जिल्हा नियोजन समितीची पूर्वमान्यता नसलेल्या एका विशिष्ट स्थळासाठी निधी मंजूर करण्यात आला, तर प्रत्यक्षात विकासाची गरज असलेल्या पर्यटन स्थळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. यामुळे निधी वाटपात पारदर्शकता नसून, हेतुपुरस्सर निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


शासनाच्या दि. ६ ऑक्टोबर २०२५ च्या स्पष्ट निर्देशानुसार, सर्व प्रस्तावित कामांची जिल्हा नियोजन समितीसमोर सविस्तर चर्चा होऊनच त्यांना प्रशासकीय मान्यता देणे बंधनकारक आहे. मात्र, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत कामांची यादीच सादर करण्यात आली नाही. असा गंभीर आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.


पुनर्विनियोजनाच्या प्रक्रियेतही नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेणे बंधनकारक असतानाही, ती न घेता परस्पर निधी वळवून विविध कामांना मंजुरी देण्यात आली. ही बाब प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
याशिवाय, लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक देणे आणि त्यांच्या पत्रव्यवहारावर तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित असताना, या सूचनांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.


राजकीय आणि प्रशासकीय खळबळ:


या संपूर्ण प्रकरणामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठी राजकीय आणि प्रशासकीय खळबळ उडाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, निधी वाटपातील पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वापर नियमबाह्य पद्धतीने करण्यात आला का, याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान , आमदार कैलास पाटील यांनी नियोजन समितीच्या सचिवाना लिहिलेल्या पत्राची गंभीर दखल शासनाकडून घेण्यात आली असून, प्रस्तुत प्रकरणात तपासणी करून आपला स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल शासनात तात्काळ सादर करण्यात यावा असं  शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.

Previous Post

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

"माणूस शिवसेनेचा लढला काँग्रेसकडून निवडून आला आणि आता विकास करणार भाजपमध्ये जाऊन", अनुराधा लोखंडे यांची खोचक पोस्ट

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांवर, उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी केला खुलासा! म्हणाले...

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share