• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ – महिला शक्तीच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव  – शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्री देवीजींच्या मुर्तीची व घटस्थापना स्थापना शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाकरे नगर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. तसेच विधीवत घटस्थापना, किर्तन, दांडिया, खेळ पैठणीचा, मेहंदी स्पर्धा, गालीचा रांगोळी प्रशिक्षण, रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा व राजस्थान येथील डॉक्टरांच्या टीमचे सलग सहा दिवस फिजिओथेरपी आरोग्य उपचार शिबिर यामध्ये डायबेटीस, बीपी ल गुडघे दुखी यावर उपचार करण्यात येणार आहेत. तर नामवंत गायकांची आराधी गीते सादर होणार आहेत. या विविध धार्मिक कार्यक्रमासह दि.२४ ते ३० सप्टेंबर दरम्यान फिजिओथेरपी उपचार करण्यात येणार आहेत.

ठाकरे नगर येथे घेण्यात आलेल्या बैठकीस मुख्य आयोजक संस्थापक अध्यक्ष देवी भक्त प्रशांत उर्फ बापू साळुंके यांच्या मातोश्री आणि या महोत्सवाच्या मुख्य आधारस्तंभ श्यामल साळुंके आदींसह २०० महिलांची प्रमुख उपस्थिती होती. याबाबत अधिक माहिती देताना साळुंके म्हणाले की, नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी मंदिरातून धाराशिव येथील ठाकरे नगरमध्ये शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी देवींची ज्योत पायी आणण्यात येणार आहे. तर आदी शक्ती पिठातील देवींच्या मंदिरातील धानाचे वाण आणून घटस्थापना नायब तहसिलदार…. यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करुन करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे नगर नवरात्र महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी दिली आहे.
तसेच या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सौ सुरेखाताई खांडेकर यांच्यावर तर उपाध्यक्षपदी सौ प्रतिभा गाडे व सचिवपदी सौ सत्यशिला गायकवाड तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून सौ योजना सलगर, सौ पूजा वाघमारे यांची तर रांगोळी प्रमुख सौ सुरेखा पवार, सौ योगिता निलंगे यांची व आरती नियोजनाची जबाबदारी सौ दीपाली गायकवाड यांच्यावर तर भोगी प्रमुख म्हणून सौ मिनाक्षी महामुनी, सौ सत्यभामा खोत तसेच देवी आणण्याची जबाबदारी सौ रेखा शिंदे यांच्या खांद्यावर दिली आहे. तर स्पर्धा प्रमुख म्हणून सौ लता राठोड व सौ कोमल कदम या काम पाहणार असून महाप्रसादाचे नियोजन सौ रुक्मिणी सुर्यवंशी सीमा कदम या करणार आहेत. तसेच होम विधी नियोजन सौ इंदू जगताप, सौ सत्यशिला गायकवाड, सौ उषा गायकवाड व सौ राणी माळी या पाहणार आहेत. तर दांडिया प्रमुख म्हणून सौ अरुणा झरकर व सौ राणी माळी या जबाबदारी निभावणार आहेत. तसेच आराधी गीत प्रमुख म्हणून विमल साठे व सौ देडे ताई यांची टीम विविध पारंपरिक देवी गीते सादर करणार आहेत. तर कुंकू मार्चनची जबाबदारी सौ अनिता पवार व सौ अनारकली शिंदे यांच्यावर सोपवली आहे. तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून सौ सीमा कदम, सौ वर्षा डोके, सौ निकिता सिरसट, सौ शितल कसपटे, चौधरी व सौ अनिता शेंडगे या निभावणार आहेत. तर फराळाच्या नियोजनाची जबाबदारी सौ उषा गायकवाड व सौ मिनाक्षी महामुनी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी केले आहे.

Previous Post

खासदार ओमराजे निंबाळकरां संदर्भात स्टेटस ठेवणाऱ्यांना भीती?, “फुसका बार” निघाला तर जाणारं इज्जत किती?

Next Post

‘लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण’, ओमराजे निंबाळकरांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र, जिल्ह्यातील “या” गंभीर विषयांवर लक्ष देऊन कारवाईची केली मागणी

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

'लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण', ओमराजे निंबाळकरांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र, जिल्ह्यातील "या" गंभीर विषयांवर लक्ष देऊन कारवाईची केली मागणी

"गंजुट्या मालकाचे आदेश, अन् गुलामांच्या पोस्ट" म्हणत धाराशिवमध्ये सोशल मीडिया वॉर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज प्रत्युत्तर, नेमकं प्रकरण काय?

व्हाट्सअप अकाउंट ब्लॉक करण्याचा नीच प्रयत्न – खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share