• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याचं दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले धाराशिवचे सीईओ मैनाक घोष”

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0



धाराशिव :गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः तडाखा दिला आहे. धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर बनली आहे. शेकडो गावे संपर्कविहीन झाली असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या घरात पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटसमयी प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असताना, धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी दाखवलेले उदाहरण प्रेरणादायी ठरले आहे.

वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर

अवघ्या एका दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबासाठी हा मोठा आघात होता. अंत्यविधीची वेदना अजूनही ताजी असतानाच, घोष यांनी वैयक्तिक दुःख बाजूला सारले. दुसऱ्याच दिवशी ते थेट पूरग्रस्त भागात पोहोचले आणि प्रशासनाच्या कामकाजात स्वतःला झोकून दिले.

गावकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

वडगाव सिद्धेश्वर येथील ग्रामस्थांनी पाझर तलावाची पातळी धोक्याची झाल्याची माहिती दिली. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात घेत, सीईओ मैनाक घोष स्वतः घटनास्थळी गेले. त्यांनी तातडीने पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या वेळेवर दिलेल्या सूचनांमुळे गावकऱ्यांमध्ये दिलासा पसरला.

कर्तव्यदक्ष अधिकारी मैनक घोष यांचे सर्वत्र कौतुक

पूरग्रस्तांची मदत, प्रशासनाची समन्वय साधणे आणि उपाययोजना गतीमान करणे या सर्व कामांत घोष यांनी वैयक्तिक वेदना बाजूला ठेवून सहभाग घेतला. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याकडून घोष यांच्या कार्यपद्धतीचे गौरवोद्गार काढले जात आहेत.

वैयक्तिक दुःख मोठं असूनही, समाजहिताला प्राधान्य


आजच्या काळात वैयक्तिक अडचणींमुळे अनेकदा अधिकारी मागे सरकतात. मात्र, मैनाक घोष यांनी याउलट उदाहरण घालून दिलं आहे. वैयक्तिक दुःख मोठं असूनही, समाजहिताला प्राधान्य देत त्यांनी प्रशासनाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा उल्लेख “कर्तव्यनिष्ठ अधिकारी” म्हणून सर्वत्र होत आहे.

Previous Post

“जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओमागे पीआर एजन्सीचा डाव?” – निवृत्त पत्रकार तानाजी जाधवरांचा गंभीर आरोप.. वाचा सविस्तर बातमी

Next Post

अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल, आत्महत्यांची मालिका सुरूचं, तुळजापूर तालुक्यातील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल, आत्महत्यांची मालिका सुरूचं, तुळजापूर तालुक्यातील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

भाजपचे नितीन भोसले म्हणाले, राणाजगजीतसिंह पाटलांनी बँकांना थेट आदेश देऊन कर्जवसुली थांबवली, उबाटा गटाने प्रत्युत्तर देत, थेट दिले कर्जवसुलीचे पुरावे.. 

घरात पाणी शिरले सर्व संसारोपयोगी साहित्य भिजले, नैराश्यातून ६५ वर्षीय महिलेने मारली नदीत उडी.. पहा घटनेचा धक्कादायक व्हिडीओ

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share