• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

घरात पाणी शिरले सर्व संसारोपयोगी साहित्य भिजले, नैराश्यातून ६५ वर्षीय महिलेने मारली नदीत उडी.. पहा घटनेचा धक्कादायक व्हिडीओ

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आपली पिकं नष्ट झाल्याने आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने हवालदिल झाला आहे.  दरम्यान, घरातील सर्व साहित्य भिजल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या एका वृद्ध महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करत नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना सापनाई परिसरात घडली. पावसाने घरातील सर्व साहित्य भिजले.  त्यामुळे, महिलेची खायची सुद्धा भ्रांत होऊ लागल्याने त्या नैराश्यात गेली आणि त्यांनी आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी मारली मात्र, योग्य वेळी धाडस दाखवत एका तरुणाने त्यांचा जीव वाचवला. या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, सदर घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी

दहिफळ येथील तेरणा नदीच्या पुलावरून भागुबाई वाघमारे (वय अंदाजे 65) या वृद्ध महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने नदीत उडी घेतली. त्याचवेळी तिथून जात असलेल्या स्कूल बस अमोल भातलवंडे यांनी महिलेने नदीत उडी मारल्याचे पहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेऊन पोहत वृद्धेकडे गेला आणि त्यांचा जीव वाचवला. वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यासाठी अमोलने जीवाची बाजी लावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वृद्ध महिलेची परिस्थिती बिकट

भागुबाई वाघमारे या विधवा असून त्यांना पती, मुलं कुणीही नाही. त्यामुळे सापनाई गावात त्या गेल्या ३५ वर्षांपासून एकट्याच वास्तव्याला आहेत. गावकऱ्यांनी त्यांना राहण्यासाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे या निवाऱ्यात पाणी शिरले आणि घरातील सर्व साहित्य भिजून गेले. या घटनेनंतर भागुबाई प्रचंड नैराश्यात गेल्या आणि आत्महत्येचा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्या भागुबाई यांना सापनाई येथील रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गावकऱ्यांत संताप व प्रशासनाकडे मागणी

गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वृद्ध महिलेच्या निवाऱ्याची सोय करून देण्याची मागणी केली आहे. “एकाकी वृद्धांच्या समस्या समजून घेऊन शासनाने तत्काळ मदत केली पाहिजे, नाहीतर अशी प्रकरणे पुन्हा घडू शकतात,” असे गावकरी म्हणाले. तर, धाडसी अमोल भातलवंडे याच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. “अमोलसारखे धाडसी युवक समाजात आहेत म्हणूनच अजूनही मानवतेवर विश्वास आहे,” असे प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Previous Post

भाजपचे नितीन भोसले म्हणाले, राणाजगजीतसिंह पाटलांनी बँकांना थेट आदेश देऊन कर्जवसुली थांबवली, उबाटा गटाने प्रत्युत्तर देत, थेट दिले कर्जवसुलीचे पुरावे.. 

Next Post

आरोग्याच्या विषयात राजकारण नको, शासनाने आरोग्याशी संबंधित कामांवरील स्थगिती तात्काळ उठवावी – आमदार कैलास पाटील

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

आरोग्याच्या विषयात राजकारण नको, शासनाने आरोग्याशी संबंधित कामांवरील स्थगिती तात्काळ उठवावी - आमदार कैलास पाटील

धाराशिव नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर; नगराध्यक्षपदावर कोण बसणार? वाचा संपूर्ण बातमी

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात धाराशिवचा नवा चेहरा! डॉ. प्रतापसिंह पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share