• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिव नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर; नगराध्यक्षपदावर कोण बसणार? वाचा संपूर्ण बातमी

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

हॅलो धाराशिव │ राज्यातील नगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत आज (दि.५) जाहीर झाली असून, धाराशिव, कळंब, भूम आणि परंडा नगरपालिकांच्या आरक्षणाचा निर्णय स्पष्ट झाला आहे. या सोडतीनुसार धाराशिव नगराध्यक्षपद ओबीसी महिला गटासाठी राखीव ठरले आहे.

या निर्णयामुळे शहरातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. एकूण ३९ नगरसेवकांच्या जागांपैकी आता ओबीसी महिला नेतृत्व धाराशिव नगरपरिषदेचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे विविध पक्षांतर्गत उमेदवारीचे गणित आणि स्थानिक नेत्यांच्या रणनीती नव्याने आखल्या जात आहेत.

मागील निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला होता. त्या वेळी शिवसेनेचे मकरंद उर्फ नंदुराजे निंबाळकर यांनी विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र नगराध्यक्षपद विरोधकांकडे गेल्याने राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले होते. त्यानंतर राणा पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनीही भाजपसोबत नवीन समीकरण रचले.

सध्या धाराशिव नगरपालिकेवर साडेचार वर्षांपासून प्रशासक राज आहे. शहरातील भुयारी गटार योजना, १४० कोटींचे शहरांतर्गत रस्ते, आणि खड्डेमय रस्त्यांसारख्या विकासकामांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून, आगामी निवडणुकीत “विकास” हा प्रमुख मुद्दा ठरणार हे स्पष्ट आहे.


दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि भाजप यांच्यात विकासाच्या मुद्यावरून शब्दयुद्ध सुरू असून, राजकीय वातावरण तापलेले आहे. यंदा मात्र मैदानात शिवसेनेचे दोन गट — उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट — समोरासमोर असणार आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व अजित पवार गट आणि काँग्रेस या पक्षांसमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे आहे.


धाराशिव हे पारंपरिक शिवसेनेचे गड मानले जात असले तरी, मागील काही वर्षांत भाजपने संघटनशक्ती वाढवत तरुण मतदारांपर्यंत पोहोच साधली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची आणि ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

Previous Post

आरोग्याच्या विषयात राजकारण नको, शासनाने आरोग्याशी संबंधित कामांवरील स्थगिती तात्काळ उठवावी – आमदार कैलास पाटील

Next Post

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात धाराशिवचा नवा चेहरा! डॉ. प्रतापसिंह पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात धाराशिवचा नवा चेहरा! डॉ. प्रतापसिंह पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

धाराशिव जिल्ह्यात दुर्दैवी घटना, दोन मुलांचा मृत्यू..

खासदारांनी सहा वर्षांत एक रुपयाही निधी आणला नाही… पण श्रेय घेण्यात मात्र आघाडीवर - नितीन भोसले यांचा ओमराजेंवर आरोप

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share