धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. वार्ड क्रमांक 14 मध्ये महाविकास आघाडीकडून अयाज उर्फ बबलू शेख यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
अयाज उर्फ बबलू शेख हे धाराशिव शहरातील ओळखले जाणारे समाजसेवक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी वार्डातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. कोणत्याही नागरिकाच्या अडचणीला स्वतःची जबाबदारी समजून त्वरित मदत करणं, हे त्यांचं वैशिष्ट्य ठरलं आहे.
त्यांच्या कार्यकाळात परिसरात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक वेळा गरजू कुटुंबांना मदतीचा हात देत त्यांनी मानवतेचा आदर्श ठेवला आहे.
बबलू शेख हे सर्व धर्म, समाज आणि घटकांना समान वागणूक देत सर्वांना एकत्र घेऊन चालणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा दांडगा जनसंपर्क, मैत्रीपूर्ण स्वभाव आणि नेहमी लोकांमध्ये राहण्याची वृत्ती यामुळे ते वार्ड 14 मध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.
महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांच्या नावाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात येतंय.











