• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

वाघोली ग्रामपंचायतीत सरपंच सुलभा संजय खडकेंचा लाखोंचा गैरव्यवहार उघड, मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, सरपंचपद धोक्यात!

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव (प्रतिनिधी): विकासकामांच्या नावाखाली निधी लाटण्याचा मोठा प्रकार धाराशिव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीत उघड झाला आहे. वाघोली गावातील माजी उपसरपंच सतीश खडके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पंचायत समिती स्तरावर चौकशी करण्यात आली असता, ग्रामपंचायत सरपंच सुलभा संजय खडके, तसेच तत्काळीन ग्रामसेवक एस. एन. शिंदे आणि ई. बी. माने यांनी १४ वा व १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रुपयांचा  गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या संदर्भात अंतिम अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांनी दिला आहे.

सरपंच व अधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी अनेक वेळा नोटिसा बजावण्यात आल्या



गटविकास अधिकारी पंचायत समिती धाराशिव यांनी केलेल्या चौकशीनंतर, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९(१) नुसार संबंधितांवर कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यानंतर विभागीय आयुक्तांनी चौकशीस परवानगी दिली असून, संबंधित सरपंच व अधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी अनेक वेळा नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

एलईडी बल्ब खरेदीतील धक्कादायक गैरव्यवहार ,  वॉरंटी संपण्याआधीच नवीन खरेदी!


ग्रामपंचायत वाघोलीने ६ एप्रिल २०२२ रोजी ४८१ एलईडी पथदिवे (बल्ब) खरेदीसाठी तब्बल रुपये ७,०४,०८७ खर्च केल्याची नोंद आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील खांबांची संख्या फक्त ३१० असल्याचे सरपंचांनी स्वतः खुलाशात नमूद केले आहे, मात्र खरेदी त्यापेक्षा अधिक करण्यात आली. त्याहून धक्कादायक म्हणजे  या बल्बची वॉरंटी दोन वर्षांची (एप्रिल २०२४ पर्यंत) असतानाही, वॉरंटी संपण्यापूर्वीच नव्याने २२० एलईडी बल्ब रुपये ६,०८,७८२ ला खरेदी करण्यात आले! या माध्यमातून  ग्रामपंचायतीने वॉरंटीचा फायदा न घेता थेट निधीचा अपव्यय केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गैरव्यवहाराबाबत सरपंच सुलभा खडके आणि तत्कालीन ग्रामसेवक एस.एन. शिंदे यांच्याकडून प्रत्येकी ३,०४,३९१/- वसूल करण्याचे आदेश प्रस्तावात नमूद करण्यात आले आहेत.


ई-लर्निंगच्या नावाखाली हेराफेरी — प्रोजेक्टरऐवजी प्रिंटर!



१५ व्या वित्त आयोगांतर्गत ३० मार्च २०२२ रोजी रुपये ३,५०,००० च्या ई-लर्निंग साहित्याची खरेदी करण्यात आली. दस्तऐवजात दोन प्रोजेक्टर खरेदी केल्याचे दाखवले गेले असले, तरी सरपंचांनी खुलाशात “प्रोजेक्टरऐवजी प्रिंटर घेतला” असल्याचे सांगितले आहे. ही खरेदी पूर्णपणे नियमबाह्य असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधितांवरून रुपये ६४,४५०/- वसुलीची शिफारस करण्यात आली आहे. तसेच १७ मे २०२३ रोजी पुन्हा रुपये ३,५०,००० च्या खरेदीमध्ये खुर्च्या, बोर्ड, टेबल अशा वस्तू घेतल्याचे दाखवले गेले, पण त्या वस्तू शाळांना प्रत्यक्ष दिल्या गेल्याचा कोणताही पुरावा ताबा पावतीत नाही. दरम्यान, याबाबतच्या खुलाशांमध्ये विसंगती आढळून आली असून रुपये १,२५,१५०/- च्या अपहाराचा ठपका सरपंच सुलभा खडके आणि ग्रामसेवक एस.एन. शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, दरम्यान सार्वजनिक ठिकाणी ठेवण्याच्या कुंड्या यासाठी तीन लाख रुपयाची खरेदी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात पाच कुंड्या खरेदी करण्यात आल्या याची वसुली शासनाकडून दोन लाख १६ हजारापेक्षा जास्त वसुलीचे आदेश देण्यात आले.

जबाबदारी आणि आकडेवारी थरकाप उडवणारी!



गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार सुलभा संजय खडके (सरपंच) या रुपये ५,६७,०६६/- च्या थेट गैरव्यवहारास आणि रुपये २,४८,९५०/- आक्षेपाधीन रकमेच्या जबाबदार आहेत. एस. एन. शिंदे (ग्रामसेवक) हे रुपये ५,७३,८०८/- गैरव्यवहारास आणि rulaye २,४८,९५०/- आक्षेपाधीन रकमेचे जबाबदार आहेत. तर, ई. बी. माने (माजी ग्रामसेवक) हे रुपये ५७,४५०/- गैरव्यवहारासाठी जबाबदार ठरले आहेत.

Previous Post

जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांचा शिवसेनेत प्रवेश, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भगवा हाती

Next Post

माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगरांच्या कन्या लक्ष्मी बंडगरांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा मजबूत दावा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दिली मुलाखत

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

Next Post

माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगरांच्या कन्या लक्ष्मी बंडगरांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा मजबूत दावा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दिली मुलाखत

युवा नेतृत्वाचा नवा अध्याय, प्रभाग १० साठी ऋषिकेश चपने दखल करणार उमेदवारी अर्ज

अंबेहोळ गावातील सरपंच मयूर लोंढे यांचा उपक्रम; गावातील सर्व महिलांना तुळजापूर-अक्कलकोट देवदर्शनासाठी विशेष भेट!

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share