• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगरांच्या कन्या लक्ष्मी बंडगरांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा मजबूत दावा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दिली मुलाखत

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0



धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 नगराध्यक्ष पद ओबीसी महिला करिता आरक्षित आहे. या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून धाराशिव शहरातील नगराध्यक्ष  व नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे कार्यालय पवन राजे कॉम्प्लेक्स या ठिकाणी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री मकरंद राजेनिंबाळकर आणि जिल्हाप्रमुख आमदार श्री.कैलासदादा पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.  यावेळी नगराध्यक्ष पदासाठी धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांची जेष्ठ कन्या लक्ष्मी दत्ता बंडगर रा.भानू नगर यांनी मुलाखत दिली असून त्यांचे शिक्षण एम. ए. , बी एड झाले आहे. शहरातील नामांकित अभिनव इंग्लिश स्कूल येथे त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले असून, शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे . शहरातील महिलांना आर्थिक बचतीचे महत्त्व पटवून देऊन बचत गटांची निर्मिती केलेली आहे.कोरोना काळानंतर 2020 पासून ते त्यांचा वडिलोपार्जित बेकरी व स्वीट मार्ट च्या व्यवसायात सक्रिया आहेत.तसेच 2005 मध्ये शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधी (यु आर) म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्यांचे वडील दत्ता बंडगर हे शहरातील  प्रसिद्ध  मिठाई व बेकरी व्यावसायिक असून सन 2001 पासून ते नगरसेवक उपनगराध्यक्ष व यशस्वी नगराध्यक्ष म्हणून धाराशिव नगरपालिकेत काम केले आहे.
*धाराशिव शहराच्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक अशी शहराची उजनी पाणीपुरवठा योजना प्रस्ताव केंद्र शासन व राज्य शासन समिती समोर सादर करून त्यांच्या नगराध्यक्ष काळामध्ये ही योजना मंजूर करून घेतली व त्या कामाची सुरुवात केली, त्या सोबतच रुईभर फिल्टर येथे एक व तेरणा फिल्टर येथे दोन पाणी टाक्यांचे बांधकाम पूर्ण करून जलशुद्धीकरण केंद्राची नूतनीकरण केले.
* धाराशिव नगरपालिका सक्षम बनविण्यासाठी व शहरातील व्यापार वाढविण्याकरिता आरक्षण क्रमांक 52, 71,72 या ठिकाणी व शहर पोलीस स्टेशन शेजारी मोठ्या व्यापारी संकुलाची उभारणी केली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्र शासनाकडून मान्यता घेऊन त्याची यशस्वीपणे उभारणीचे काम दत्ता बंडगर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात करण्यात आले. धाराशिव शहरातील ग्रामदैवत असलेले धारासुर मर्दिनी मंदिर व खाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्लाआली दर्गाह परिसर सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन विभाग यांचे कडून तीर्थक्षेत्र विकास निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून आवश्यक कामे पूर्ण केली. नेहरू चौक ते दर्गाह पर्यंत रस्ता रुंदीकरण व नवीन पुलाची बांधणी केली.
*

शहराच्या मध्यभागी असलेल्या जिजामाता उद्यान, रामनगर येथील उद्यान,समता नगर, खरोसे कर कॉलनी येथील उद्यान कामासाठी निधी मंजूर करून, त्या बगीच्यांची उभारणी करून शहरातील लहान मुले व जनतेसाठी बगीचा उपलब्ध करून दिल्या. अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या धाराशिव शहरातील सर्व जातीधर्माच्या स्मशानभूमी दुरुस्त्यांची कामे करून त्या सुशोभित केल्या. धाराशिव शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी फायबरचे शौचालय, प्रत्येक चौका चौकामध्ये फायबर डस्टबिन बसवण्याचे कामही करण्यात आले. धाराशिव शहरामध्ये सर्वप्रथम कचरा संकलन करण्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणून घंटा गाड्यांची सुरुवात करून शहर घनकचरा संकलन योजना प्रभावीपणे राबवली. नागरिकांना धाराशिव नगरपालिकेतील सर्व योजनांची माहिती सहजपणे उपलब्ध होण्यासाठी टच स्क्रीन मशीनची उभारणी कार्यालयाच्या आवारात केली. नगरपालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन फर्निचर केबिन बनवून कार्यालयाचे सुशोभीकरण करण्यात आले. नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी यांची संहिता विचारात घेता कर्मचारी आकृतीबंध कार्यक्रम नगरपरिषद संचालनालय व राज्य शासनाकडून मान्य करून घेऊन बरेच प्रतीक्षा यादीतील कर्मचारी नोकरीत कायम करण्याचे प्रशासन स्तरावर अतिशय मोलाचे योगदान. माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी धाराशिव शहरासाठी केलेल्या विकास कामांच्या जोरावर लक्ष्मी दत्ता बंडगर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली. दत्ता बंडगर यांची अभ्यासपूर्वक प्रशासन चालवण्याची  हातोटी, राज्य शासन,केंद्र शासन यांच्याकडून शहर विकास कामांच्या योजना साठी अर्थसहाय्य मिळविण्याचा अनुभव. शासन स्तरावरील त्यांचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी असलेला परिचय. या सर्व बाबी विचारात घेता  लक्ष्मी दत्ता बंडगर यांची उमेदवारी अपेक्षित असून त्या विजयी होतील असे जनतेत बोलले जात आहे.

Previous Post

वाघोली ग्रामपंचायतीत सरपंच सुलभा संजय खडकेंचा लाखोंचा गैरव्यवहार उघड, मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, सरपंचपद धोक्यात!

Next Post

युवा नेतृत्वाचा नवा अध्याय, प्रभाग १० साठी ऋषिकेश चपने दखल करणार उमेदवारी अर्ज

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

राजकारण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

राजकारण

“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

Next Post

युवा नेतृत्वाचा नवा अध्याय, प्रभाग १० साठी ऋषिकेश चपने दखल करणार उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share