• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

कोकणातील हाफुस प्रमाणे जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादकाना आर्थिक मदत द्यावी; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0


धाराशिव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट आले आहे. त्यातच अतिवृष्टी आणि हवामानातील बदलांमध्ये जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसून आर्थिक नुकसान झाले आहे. कोकणातील हापूस आंब्यास नुकसान भरपाई दिली तशीच अर्थिक मदत केशर आंब्यास जाहीर करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे.


धाराशिव जिल्ह्यात काही वर्षात केशर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. येथील हवामान आणि भौगोलिक स्थानामुळे जिल्ह्यातील केशर आंब्याला विशिष्ट चव आणि गोडवा आहे. जिल्ह्यात केशर आंब्याचे क्षेत्र साडेचार हजार हेक्टर इतके आहे. येथील काही शेतकरी केशर आंबा निर्यात देखील करतात. यावर्षी बदलत्या हवामानाचा फटका आंबा बागांना बसला आहे. मोहर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, फळमाशीचा प्रादुर्भाव तसेच गारपिटीमुळे यावर्षी आंबा उत्पादनात 80 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे येथील आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याच समस्येमुळे यावर्षी कोकणातील हापूस आंब्याला देखील मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 22 हजार 500 रुपयांची मदत जाहीर करून वितरित देखील केली आहे. मात्र या समस्येमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने अजूनही मदत जाहीर केलेली नाही.

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील चार तालुक्यातील केशर आंबा बागांची कृषी विभागाच्या पथकासह पाहणी केली. त्यांनी देखील यावर्षी उत्पादनात पन्नास टक्के घट येत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यावर आधारित नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी कृषी आयुक्तालयाला पाठवला आहे. त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. कोकणच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 22 हजार 500 रुपयांची मदत जाहीर करावी.

तसेच ज्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी फळबागेचा विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट फळपीक विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

Previous Post

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

Next Post

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
Uncategorized

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

जिल्हा

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

जिल्हा

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

जिल्हा

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांवर, उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी केला खुलासा! म्हणाले…

जिल्हा

“माणूस शिवसेनेचा लढला काँग्रेसकडून निवडून आला आणि आता विकास करणार भाजपमध्ये जाऊन”, अनुराधा लोखंडे यांची खोचक पोस्ट

जिल्हा

नियम धाब्यावर, निधी वाटपात प्रचंड अनियमितता, आमदार कैलास पाटील यांची चौकशीची मागणी, शासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना मागितला स्वयंस्पष्ट अहवाल

Next Post

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share