धाराशिव
धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर भाजपचे पदाधिकारी टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षण मिळाल्यानंतर कुठलीही पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर न केल्याने भाजपचे पदाधिकारी जोरदार टीका करताना दिसत आहेत. एरवी पाहिले तर ओमराजे निंबाळकर यांच्या फेसबुकवर लहान मोठ्यांचा वाढदिवस किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाची पोस्ट टाकली जाते. मात्र मराठा आरक्षण मिळाल्यानंतर निंबाळकर यांनी एकही पोस्ट शेअर केली नसल्याने भाजपचे पदाधिकारी अभिजीत पतंगे यांनी जोरदार टीका केली आहे. केवळ श्रेय घेता न आल्याने तुमच्या पोटात मळमळ होतेय का? असा सवाल पतंगे यांनी केला आहे.
अभिजीत पतंगे यांनी निंबाळकरांवर काय केले टीका?
भाजपचे पदाधिकारी असणाऱ्या अभिजीत पतंगे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर कार्टूनच्या माध्यमातून टीका केली आहे. फेसबुकवर पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या विजयाने केवळ श्रेय घेता येत नाही म्हणून तुमच्या पोटात मळमळ होत आहे का असा सवाल पतंगे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.










