• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

राजकीय कुरघोडीत नागरिकांना त्रास नको! आमदार कैलास पाटील यांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0
राजकीय कुरघोडीत नागरिकांना त्रास नको! आमदार कैलास पाटील यांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

धाराशिव ता. 26: शहरातील रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, भुयारी गटार अशा मूलभूत सुविधा देताना राजकीय कुरघोडीचा फटका सामान्य नागरिकांना बसू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अश्या सूचना आमदार कैलास पाटील यांनी आढावा बैठकीत दिल्या.
आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक (ता. 24) रोजी पार पडली.यावेळी अधिकाऱ्यांनी नागरी समस्याकडे गांभीर्याने पाहण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, तहसीलदार मृणाल जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक, प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांबाबत आमदार पाटील म्हणाले, रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे असून 140 कोटीच्या कामाची फेरनिविदेची प्रक्रिया सुरु होण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, दुसरीकडे नियोजन समितीच्याही कामाना स्थगिती आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून त्याबाबत पाठपुरावा करावा अश्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या. राजकीय कुरघोडी करताना जनतेचे हाल होणार नाहीत याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असं आमदार पाटील यांनी सांगितले.
शहरातील पथदिव्यांचा दुरुस्ती करणे हे नगरपालिकेचे काम आहे. कंपनी व त्याचा करार ही कारणे किती दिवस जनतेला सांगणार आहात?सण उत्सवाच्या दिवसात शहरात अंधार होणार नाही यासाठी पालिकेच्या स्तरावर दिवाबत्ती खरेदीची सोय करावी.
तुंबलेल्या गटारी, नालेसफाई होत नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. नालेसफाईच काम या कंपनीला होत नसेल तर त्याच्याकडून हे काम काढून घेऊन नवीन कंत्राट काढा. यामध्ये प्रभागनिहाय निविदा काढता येत असतील तर ते अधिक योग्य होऊन हा प्रश्न मार्गी लागेल याबाबत लवकर निर्णय घ्या असा आदेश आमदार पाटील यांनी दिला. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर जिथं आवश्यक आहे तिथं फक्त मुरूम टाकून भागणार नाही. मुरूम टाकून त्याची दबई करून कामाच्या ठिकाणी जिओ टॅगची अट टाका अन्यथा दरवेळीप्रमाणे पुन्हा निकृष्ट काम होतील. सर्व कामे दर्जेदार झाली असतील तरच बिल काढावी अन्यथा ती कामे पुन्हा व्यवस्थित करण्यास सांगावी.
कचरा डेपोबाबत पालकमंत्री यांनी दिलेल्या साडेचार कोटीच्या बायोमायनिंग प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे? अशी विचारणा करून तातडीने त्याची प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. नागरी समस्या सोडविण्यासाठी कुणाची अडचण आहे. नागरिकांतुन तीव्र रोष दिसत असतानाही आपल्याकडून काहीच होत नाही. यापुढे हे खपवून घेणार नसल्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला. आमदार पाटील यांनी संबंधित विभागांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कार्यक्षमतेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून हलगर्जी ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असे आदेशही आमदार पाटील यांनी यावेळी दिले.

Previous Post

तौफिक काझी, इरफान शेख यांच्यासह शेकडो तरुणांचा शिवसेना (ठाकरे) मध्ये जाहीर प्रवेश

Next Post

धाराशिव जिल्ह्यात घडलेले गुन्हे आणि पोलिसांच्या कारवाया

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Uncategorized

बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार
Uncategorized

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार

Uncategorized

Hello world!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात घडलेले गुन्हे आणि पोलिसांच्या कारवाया

धाराशिव जिल्ह्यात घडलेले गुन्हे आणि पोलिसांच्या कारवाया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share