• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिव शहरातील अवैध धंद्यावर विशेष पोलीस पथकाची धाड

धाराशिव शहर पोलीस प्रमुखाचे हाताची घडी तोंडावर बोट !

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0



धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील गल्लोगल्ली अवैध धंद्याचे पेव फुटून ऊत आला आहे.
या अवैध धंद्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन देशोधडीला लागले व लागत आहेत. त्यामुळे या धंद्याला आळा घालण्यासाठी दि.१८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास भवानी चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ५२ लगत असलेल्या गाझी हॉटेल शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये…अंधेरी रातो में, सुनसान पत्रों के शेड की आसरा में… तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईमध्ये १० लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा भाग धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. मात्र, धाराशिव शहर पोलिसांचे या अवैध धंद्याकडे सोयीस्कररित्या अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ‌ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला त्या ठिकाणी धडक कारवाई करण्याची वेळ ओढवली. जर ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी केली असती तर या परिसरात विशेषतः शहरात अवैध धंदे बोकाळले नसते.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१८ ऑगस्ट रोजी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ५२ लगत असलेल्या गाझी हॉटेल लगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण वर्तुळ करून तिरंट नावाचा जुगार खेळत असल्याची खत्रीशीर व गोपनीय माहिती मिळाली. ती माहिती मिळताक्षणीच अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या स्वतंत्र पथकाने सापळा रचून धाड टाकली. या धाडीमध्ये सर्फराज मक्सुद कुरेशी, जुबेर जमील शेख, श्रीकांत बाबासाहेब शिंदे, पाशा कमाल पटेल, अजमतुल्ला जब्बार शेख, अमोल प्रकाश देढे, अलिम करम सय्यद, सागर मारुती भांडवले, आबेद अब्दुल करीम शेख आणि रविंद्र मैंदाड (सर्व रा. धाराशिव) यांना खेळत असताना रंग हात पकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्या ठिकाणाहून पत्त्यांचे संच, रोख रक्कम, विविध मोबाईल फोन्स, एटीएम कार्डे, पाच दुचाकी आणि एक कार असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. विशेष म्हणजे रविंद्र मैंदाड याच्याकडून ६ लाख ५८ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल मिळाला असून यात मारुती सुझुकी इर्टिगा (एमएच – २५ एएस – ६८८६) कारचाही समावेश आहे. तर इतरांकडून होंडा शाईन (एम एच – २५ एक यू- ६४८५), जिक्सर (एमएच – २५ एई – ७६६०), एचएफ डिलक्स (एमएच – १२ एनटी – १२६८), स्लेंडर प्लस (एमएच -१३ एडी – ४४५३) असा दुचाकी तसेच सॅमसंग, रेडमी, विवो, ओप्पो, ऍपल आदी कंपन्यांचे मोबाईल व विविध मूल्यांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेचे पोहेकॉ स्वप्नदिप उद्वराव भोजगुडे यांच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३९६/२०२५ भादंविसह थेट महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.  ही दमदार कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली वाचक शाखेचे सपोनि हिंगोले यांच्या विशेष पथकाने केली आहे. पुढील तपास पोना क्षिरसागर करीत आहेत.

Previous Post

वा रे नौटंकी! शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके उद्धव सेनेवर बरसले.. आंदोलनावरून शहरातील वातावरण तापले, विरोधकही आक्रमक

Next Post

गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे!
आमदार कैलास पाटील यांनी केली तुळजापूर तालुक्यातील पिकांची पाहणी

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

क्राईम

पत्रकार सुनील ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर, ॲड. विशाल साखरे यांचा जोरदार युक्तिवाद

क्राईम

“बनावट मीडीयाचा पर्दाफाश”, धाराशिव नगरपालिका निवडणुकीत फेक एक्झिट पोल प्रकरणात अखेर धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल…

Next Post

गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे!
आमदार कैलास पाटील यांनी केली तुळजापूर तालुक्यातील पिकांची पाहणी

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share