• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

भाजपाचा जल्लोष, मल्हार पाटलांनी वाढवली 71 हजारांवरून थेट 1 लाख 11 हजारांची बक्षिसाची रक्कम, महाविकासआघाडीच्या स्टेजवर शांतता

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव

धाराशिव शहरात गणेशोत्सवावेळी महाविकासआघाडी आणि भाजप समोरासमोर आल्याचे आले होते. यावेळी, दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. शिस्तबद्ध गणेश विसर्जन स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या बक्षिसांची रक्कम देखील वाढवण्यात येत होती. महाविकासआघाडीने बक्षिसांची रक्कम 55 हजार ठेवली होती. तर, भाजपने शिस्तबद्ध गणपती विसर्जनाची बक्षिसाची रक्कम 71 हजार ठेवली होती. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपचे मंडप समोरासमोर असल्याने बक्षिसांच्या रकमा वाढवण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. भाजपने 71 हजार रुपयांच्या बक्षीसाची रक्कम 1 लाख 11 हजार रुपयांपर्यंत नेली. तर, महाविकासआघाडीकडून एक छदाम देखील वाढवण्यात आला नाही. त्यामुळे, बक्षिसांची रक्कम वाढवण्यात महाविकासआघाडीचा पराभव झाला असल्याच्या चर्चा गणेश भक्तांमध्ये सुरू होत्या.

महाविकासआघाडीच्या स्टेजवर शांतता, भाजपच्या स्टेजवर जल्लोष

गणेशोत्सव मिरवणुकीच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते आमने-सामने आले होते. शहरातील काळा मारुती परिसरात भाजप आणि महाविकास आघाडीचे स्टेज आमने-सामने होते. भाजपच्या स्टेजवर मल्हार पाटील यांच्यासह अमित शिंदे, नितीन काळे, नितीन शेरखाने, अक्षय ढोबळे, अभिजीत पतंगे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते होते. तर, महाविकास आघाडीच्या स्टेजवर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. गणपतीची मिरवणूक आल्यास दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी होत होती. मल्हार पाटील यांचे कार्यकर्ते दंड थोपटून गाण्याच्या तालावर ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्याकडे बघत “कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास” अशी गाणी लावून जल्लोष करत होती. बक्षीसांची रक्कम वाढवली जात होती. 71 हजार रुपयांवरून 1 लाख 11 हजार रुपये बक्षीस मल्हार पाटलांनी  वाढवले. मात्र,  महाविकासआघाडीकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नव्हता. स्टेजवर फक्त घोषणाबाजी होत होती.  बक्षीसांची रक्कम वाढवली गेली नाही किंवा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला नाही.

गणेश मंडळांकडून राणाजगजितसिंह पाटील यांचे कौतुक


मराठा आरक्षणाच्या काळात मुंबईमध्ये मराठा समाजाचे प्रचंड हाल झाले होते. यावेळी, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबईत आपल्याला थारा दिला. राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. असं म्हणत गणेश मंडळांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे कौतुक केले. मात्र, काही नेते असे आहेत की त्यांनी साधी फेसबुक वर पोस्ट देखील केली नाही असं म्हणत खासदार निंबाळकरांवर खंत देखील व्यक्त केली.

Previous Post

मराठा आरक्षणाच्या विजयाचे श्रेय घेता येत नसल्याने तुमच्या पोटात मळमळ होतेय, कार्टूनच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकरांवर पतंगेंची सडकून टीका

Next Post

“उजनीच पाणी आणून दाखवलं”वर मल्हार पाटलांचा डान्स, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांनी सोडलं स्टेज! व्हिडीओ व्हायरल

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

“उजनीच पाणी आणून दाखवलं”वर मल्हार पाटलांचा डान्स, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांनी सोडलं स्टेज! व्हिडीओ व्हायरल

ईद मिलादुन्नबी विशेष, धाराशिवमध्ये 236 रक्तदात्यांचा सहभाग, एसीएम ग्रुप व पाकीजा संस्थेचे पुढाकार

आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून, "धन्यवाद, खा ओम ! आम्हाला कळालं".. चालवण्यात येतोय ट्रेंड... नेमकं घडलंय काय?

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share