• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

‘लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण’, ओमराजे निंबाळकरांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र, जिल्ह्यातील “या” गंभीर विषयांवर लक्ष देऊन कारवाईची केली मागणी

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील अत्यंत गंभीर आणि तातडीच्या विषयाकडे आपले लक्ष वेधले आहे. दरम्यान, यापूर्वी देखील ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ड्रग्ज रॅकेटवर झालेल्या कारवाईमध्ये केवळ दिखावा करण्यात आला असल्याचे म्हटले होते. मात्र, यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात खासदार निंबाळकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

तुळजापूर शहरात वाढलेल्या ड्रग्ज रॅकेटवर झालेल्या कारवाईमध्ये केवळ दिखावा करण्यात आला असून, या रॅकेटचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाला असून, ते पुन्हा समाजात वावरत आहेत. चिंतेची बाब म्हणजे, राज्याचे एक जबाबदार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यांनी जामिनावर सुटलेल्या अशाच एका आरोपीचा जाहीर सत्कार करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सरकारच्या या कृतीमुळे जनतेत आणि लोकप्रतिनिधींमध्ये अत्यंत चुकीचा संदेश जात असल्याचं खासदार निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

आमदार कैलास पाटील यांनी वेळोवेळी आपली भेट घेऊन निःपक्षपाती कारवाईची मागणी केली होती –  निंबाळकर

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, मी स्वतः लोकसभेत, तर आमदार कैलास पाटील यांनी  विधानसभेत हा विषय लावून धरला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. याउलट, ज्या पोलीस उपअधीक्षक (श्री. निलेश देशमुख) यांच्या कार्यकाळात तुळजापुरात ड्रग्जचा सुळसुळाट झाला, त्यांची बदली करण्याऐवजी त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे, त्यालाच बक्षीस देणे हे सरकारच्या धोरणांवर शंका निर्माण करते. याच अधिकाऱ्याकडे प्रकरणाचा तपास ठेवणे म्हणजे ‘लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण देण्यासारखे’ आहे असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.

ओमराजे निंबाळकर यांनी पत्रात या प्रमुख मागण्या केल्या आहेत

१. ड्रग्ज रॅकेटमधील सर्व मुख्य आणि मोकाट आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करावी.

२. जामिनावर सुटलेल्या आरोपीचा जाहीर सत्कार करणाऱ्या मंत्र्यांवर नैतिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.

३. वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक, श्री. निलेश देशमुख, यांना दिलेली एक वर्षाची मुदतवाढ त्वरित रद्द करून त्यांची तातडीने बदली करावी.

४. या संपूर्ण प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे करण्यासाठी तो दुसऱ्या उच्चस्तरीय आणि स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्यात यावा.

आपण एक संवेदनशील नेते आहात. या निवेदनाचा कोणताही पक्षीय भेद न मानता, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, या मागण्या निंबाळकर यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.

Previous Post

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ – महिला शक्तीच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post

“गंजुट्या मालकाचे आदेश, अन् गुलामांच्या पोस्ट” म्हणत धाराशिवमध्ये सोशल मीडिया वॉर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज प्रत्युत्तर, नेमकं प्रकरण काय?

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

"गंजुट्या मालकाचे आदेश, अन् गुलामांच्या पोस्ट" म्हणत धाराशिवमध्ये सोशल मीडिया वॉर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज प्रत्युत्तर, नेमकं प्रकरण काय?

व्हाट्सअप अकाउंट ब्लॉक करण्याचा नीच प्रयत्न – खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे ध्वजारोहण; मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजवंदन

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share