• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

खासदारांनी सहा वर्षांत एक रुपयाही निधी आणला नाही… पण श्रेय घेण्यात मात्र आघाडीवर – नितीन भोसले यांचा ओमराजेंवर आरोप

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

हॅलो धाराशिव | Hello Dharashiv – Desk

धाराशिव जिल्ह्यातील वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानुसार, आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नवीन उपकेंद्र उभारणी व विद्यमान केंद्रांचे श्रेणीवर्धन करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले असल्याचं भाजपचे प्रवक्ते नितीन भोसले यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच आशियाई विकास बँकेकडून (ADB) मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल होणार असल्याचंही भोसले म्हणाले.


मात्र, हा प्रस्ताव मंजूर होणार हे लक्षात येताच, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकल्पाचे श्रेय स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्यक्षात सहा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यासाठी एक रुपयाचाही निधी आणण्यात त्यांना अपयश आले. त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री सत्तेवर असतानाही धाराशिव जिल्ह्यासाठी काही ठोस कामगिरी नोंदवता आली नाही. आता मात्र, राज्य सरकार आणि आमदार राणा दादा यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी होणाऱ्या कामांचे श्रेय घेण्यासाठी निंबाळकर यांची धडपड सुरू आहे. असा आरोप नितीन भोसले यांनी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केला.


जनतेच्या हितासाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर “माझ्या प्रयत्नांमुळे झालं” असं सांगत स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न लोकांच्या लक्षात येत आहे. आणि जेव्हा काम थांबतं किंवा विलंब होतं, तेव्हा “सरकारमुळे झालं नाही” असा ठरलेला पवित्रा घेऊन जबाबदारी झटकण्याची पद्धत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळांमध्ये आता चर्चा सुरू आहे की, काम करणारे शांतपणे काम करतात, आणि फक्त नाव कमावणारे जाहिराती करतात. जनतेला हवे आहेत काम करणारे नेते केवळ सोशल मीडियावर पोस्ट करून श्रेय घेणारे नव्हे. असं नितीन भोसले यांनी म्हटलं.


धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमदार राणा दादा यांच्या कामगिरीमुळे आज अनेक प्रलंबित प्रकल्प गतीमान झाले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच्या मेहनतीचं श्रेय घेण्याचा राजकीय प्रकार जिल्ह्याच्या जनतेला लाजिरवाणा आणि हास्यास्पद वाटत आहे. “बंद करा असली अर्धवट माहिती आधारे चालवलेली नौटंकी!” — असं म्हणत नागरिकांनी आता थेट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काम झालं की “माझ्या प्रयत्नांमुळे झालं”, आणि नाही झालं की “सरकारमुळे झालं नाही”वारे खासदार… दरम्यान,  खासदार यांनी सहा वर्षात १ रुपयाही निधी आणला नाही. त्यांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यासाठी कामगिरी शून्य आणि दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला मात्र सर्वात पुढे. असं भोसले म्हणाले..

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात दुर्दैवी घटना, दोन मुलांचा मृत्यू..

Next Post

धाराशिव नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीकडे (शरद पवार) पक्षाकडे प्रबळ दावेदार – प्रतापसिंह पाटील यांचा दावा

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

धाराशिव नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीकडे (शरद पवार) पक्षाकडे प्रबळ दावेदार - प्रतापसिंह पाटील यांचा दावा

“फसवे दिखावे आणि खोटं राजकारण!” अभिजीत पतंगेंचा खासदार ओमराजेंवर जोरदार निशाणा

जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस, आज होणार आरक्षण  जाहीर.. वाचा संपूर्ण बातमी

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share