• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिवला जंक्शन होणार, अर्थकारणाला गती मिळणार, सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदिल : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0


धाराशिव रेल्वेस्थानक पूर्वी प्रस्तावित होते, त्यापेक्षा तिप्पट मोठे होणार आहे. पर्यायी रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे. प्रवाशांसह कर्मचारी आणि अधिकार्‍यांकरिता अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. रस्त्यांच्या वरून आणि खालून जाणार्‍या पुलांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सोलापूर शहरातील जमीन रेल्वेमार्गासाठी संपादन करण्याकरिता तेथील सध्या प्रचलित असलेले दर गृहित धरण्यात येणार आहेत. वरील सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ३२९५ कोटी रूपयांच्या सुधारीत आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. धाराशिवला जंक्शन रेल्वे स्थानक होणार, अर्थकारणाला गतीही मिळणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र आता लवकरच रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर झळकणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव प्रकल्प किंमतीनुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्यानुसार रेल्वे बोर्डाने ५० टक्के तरतूद केल्यानंतर उर्वरित ५० टक्के राज्य हिश्याचा वाटा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ३२९५ कोटी रूपयांच्या सुधारित आराखड्यावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. एकूण ८४.४४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी ९०४ कोटी ९२ लाख रूपयांची मंजुरी देण्यात आली होती. आता त्यामध्ये तिपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आपण सातत्याने विधीमंडळात हा विषय लावून धरला होता. ठाकरे सरकारच्या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी तातडीने या महत्वपूर्ण रेल्वेमार्गासाठी राज्याचा ५० टक्के हिस्सा देण्याचा पावले उचलावीत, असा पाठपुरावाही आपण केला होता. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या महायुती सरकारने सुधारीत आराखड्यानुसार ५० टक्के राज्य हिश्याचा वाटा देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेले तुळजापूर रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आता झळकणार आहे. त्याचबरोबर तुळजापूर ते सोलापूर या टप्प्यातील रेल्वेमार्गाच्या कामालाही गती मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत चार हजार चौरस मीटरवरून आता १२ हजार ६३० चौरस मीटर होणार आहे. एकंदरीत रेल्वे स्थानकाची इमारत तिप्पट मोठी होणार आहे. वेगात जाणार्‍या जलदगती रेल्वेगाड्यांना तत्काळ मार्ग मिळावा यासाठी आवश्यक असणारी पर्यायी व्यवस्थाही उभारली जात आहे. यार्डाच्या आवश्यकतेनुसार मोठ्या लांबीची लूपलाईनही अंथरली जाणार आहे. पूर्वी रस्त्याखालून जाणार्‍या पुलांची संख्या २० होती. आता त्यात वाढ करण्यात आली असून रस्त्याखालून रेल्वेमार्गासाठी ३१ पूल उभारले जाणार आहेत. सेालापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्वाच्या पुलाची लांबी वाढविण्यात आली आहे. ३८५ मीटरऐवजी हा पूल ३९९ मीटर एवढा लांब असणार आहे. प्रवाशांसाठी अनेक महत्वपूर्ण सोयी-सुविधांचा या आराखड्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. पथमार्ग, दादरा, प्लॅटफॉर्म यासह जमिनीखाली आणि जमिनीच्या वर पाण्याच्या मोठ्या टाक्या उभारल्या जाणार आहे. त्यासाठीही दुप्पट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची संख्या ३४२ वरून ३७३ करण्यात आली आहे. त्यासाठी सुधारित आराखड्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने ३२९५ कोटी रूपयास मान्यता दिली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

ठाकरे सरकारमुळे रखडलेल्या रेल्वेमार्गाला महायुती सरकारमुळे गती

ठाकरे सरकारने राज्य हिश्श्याचा ५० टक्के वाटा न दिल्यामुळेच धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम अडीच वर्षे रखडले होते. त्यामुळे प्रकल्प किंमतीतही तब्बल ११७.४९ टक्के वाढ झाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०४.९२ कोटी रूपयांच्या मूळ प्रकल्प किंमत असलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गासाठी आता ३२९५ कोटी रूपये लागणार आहेत. त्याचवेळी ठाकरे सरकारने हे पैसे उपलबध करून दिले असते तर रेल्वेमार्ग कदाचित आतापर्यंत पूर्णही झाला असता. यापूर्वी राज्य सरकारने मूळ प्रकल्प किमतीनुसार ४५० कोटी रुपयांचा राज्य हिश्श्याचा वाटा दिलेला आहे. आता वाढीव २००० कोटींपैकी १००० कोटींचा राज्य वाटा देण्यासही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ठाकरे सरकारमुळे रखडलेल्या रेल्वेमार्गाला आपल्या महायुती सरकारमुळे आता गती मिळाली असून धाराशिव जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व अजितदादा पवार यांचे आपण आभार मानतो असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Previous Post

लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाल्यानेच तिळपापड! नितीन भोसले यांचा आमदार, खासदारांवर निशाणा

Next Post

धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, 'उबाठा' गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

“धाराशिवमध्ये महायुतीत तणावाचा स्फोट! येणाऱ्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घोषणा”

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share