• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी संघटनात्मक फेरबदल – धाराशिवच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आता ‘या’ नेत्याच्या हाती येणार! “हॅलो धाराशिव”ला अधिकृत सूत्रांची माहिती

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठी संघटनात्मक हालचाल होत असून, धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आता प्रतापसिंह पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात येणारं असल्याची माहिती अधिकृत माहिती मिळाली आहे. पक्षाला जिल्हा पातळीवर बळकटी देण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



पक्षाध्यक्ष शरद पवार आणि  प्रदेशाध्यक्षांच्या संमतीने ही नियुक्ती करण्यात येणार असून, जिल्ह्यातील पक्ष बांधणी, जनसंपर्क मोहीम तसेच गटातील अंतर्गत समन्वय वाढविण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवण्यात येणारं असेल.
प्रतापसिंह पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी निष्ठेने कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची धाराशिव जिल्ह्यातील पकड आणखी मजबूत होईल असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नियुक्तीबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत असून, अनेकांनी सामाजिक माध्यमांद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.



दरम्यान, शहरातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रतापसिंह पाटील यांनाच जिल्हाध्यक्ष पद देण्यात यावे, अशी ठाम मागणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, “जर प्रतापसिंह पाटील यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले नाही, तर आम्ही आमचा निर्णय येत्या दोन तारखेपर्यंत जाहीर करू.” त्यामुळे पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. अखेरीस, कार्यकर्त्यांच्या मागणीला मान देत पक्षश्रेष्ठींनी प्रतापसिंह पाटील यांच्या नावाचे पत्र तयार केल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.



आगामी स्थानिक स्वराज्य आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता, ही नियुक्ती रणनीतीच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन विस्तारासाठी विशेष मोहीम हाती घेणार असून, त्यातून धाराशिव जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Previous Post

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी जनतेची ‘राजकन्या’ पुढे; विकास, स्वच्छता आणि जनसंपर्काचा दमदार फॉर्म्युला!

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी जनतेची ‘राजकन्या’ पुढे; विकास, स्वच्छता आणि जनसंपर्काचा दमदार फॉर्म्युला!

एकनिष्ठ शिवसैनिकाच्या कुटुंबाला उमेदवारी देऊन पक्षश्रेष्ठींनी सन्मान करावा – नागरिकांची अपेक्षा

धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुणाई राजकीय दंड थोपटणार

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share