• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“उजनीच पाणी आणून दाखवलं”वर मल्हार पाटलांचा डान्स, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांनी सोडलं स्टेज! व्हिडीओ व्हायरल

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव

धाराशिवमध्ये यंदा गणेशोत्सवाची मिरवणूक भव्य आणि उत्साहवर्धक पार पडली. डीजे-मुक्त गणेश जयंतीमुळे संपूर्ण शहर ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात दुमदुमून गेले. या पारंपरिक जल्लोषात राजकारणाची चुरस देखील रंगली. मिरवणुकीदरम्यान शिस्तबद्ध गणेश विसर्जन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांचे स्टेज एकमेकांसमोरच ठोकले गेले होते. भाजपच्या स्टेजवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील उपस्थित होते, तर महाविकास आघाडीच्या स्टेजवर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हजर होते. यावेळी भाजपकडून बक्षिसांची रक्कम सतत वाढवली जात होती, तर आघाडीच्या स्टेजवर शांतता होती. अखेर मल्हार पाटील यांनी ओमराजेंच्या डोळ्यांसमोरच बक्षिसाची रक्कम वाढवत थेट “उजनीच पाणी आणून दाखवलं” या लोकप्रिय गाण्यावर डान्स सुरू केला. अचानक झालेल्या या डान्समुळे वातावरण तापलं आणि प्रेक्षकांच्या जयघोषात रंग भरले. मात्र, हा प्रसंग ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना सहन झाला नसावा. त्यामुळे, त्यांनी संतप्त होत स्टेज सोडला. या राजकीय टक्कर आणि मल्हार पाटील यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, धाराशिवच्या गणेशोत्सवात राजकीय रंग चढल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.



“कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास” अशी गाणी लावून भाजपकडून जल्लोष


गणेशोत्सव मिरवणुकीच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते आमने-सामने आले होते. शहरातील काळा मारुती परिसरात भाजप आणि महाविकास आघाडीचे स्टेज आमने-सामने होते. भाजपच्या स्टेजवर मल्हार पाटील यांच्यासह अमित शिंदे, नितीन काळे, नितीन शेरखाने, अक्षय ढोबळे, अभिजीत पतंगे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते होते. तर, महाविकास आघाडीच्या स्टेजवर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. गणपतीची मिरवणूक आल्यास दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी होत होती. मल्हार पाटील यांचे कार्यकर्ते दंड थोपटून गाण्याच्या तालावर ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्याकडे बघत “कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास” अशी गाणी लावून जल्लोष करत होती. बक्षीसांची रक्कम वाढवली जात होती. 71 हजार रुपयांवरून 1 लाख 11 हजार रुपये बक्षीस मल्हार पाटलांनी  वाढवले. मात्र,  महाविकासआघाडीकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नव्हता. स्टेजवर फक्त घोषणाबाजी होत होती.  बक्षीसांची रक्कम वाढवली गेली नाही किंवा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला नाही.

गणेश मंडळांकडून राणाजगजितसिंह पाटील यांचे कौतुक


मराठा आरक्षणाच्या काळात मुंबईमध्ये मराठा समाजाचे प्रचंड हाल झाले होते. यावेळी, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबईत आपल्याला थारा दिला. राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. असं म्हणत गणेश मंडळांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे कौतुक केले. मात्र, काही नेते असे आहेत की त्यांनी साधी फेसबुक वर पोस्ट देखील केली नाही असं म्हणत खासदार निंबाळकरांवर खंत देखील व्यक्त केली.

Previous Post

भाजपाचा जल्लोष, मल्हार पाटलांनी वाढवली 71 हजारांवरून थेट 1 लाख 11 हजारांची बक्षिसाची रक्कम, महाविकासआघाडीच्या स्टेजवर शांतता

Next Post

ईद मिलादुन्नबी विशेष, धाराशिवमध्ये 236 रक्तदात्यांचा सहभाग, एसीएम ग्रुप व पाकीजा संस्थेचे पुढाकार

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

ईद मिलादुन्नबी विशेष, धाराशिवमध्ये 236 रक्तदात्यांचा सहभाग, एसीएम ग्रुप व पाकीजा संस्थेचे पुढाकार

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share