• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

हॅलो धाराशिव ; धाराशिव शहरात भाजप कार्यकर्त्याची गुंडगिरी समोर आली आहे. भाजपच्या या गुंड कार्यकर्तामुळे धाराशिव शहरातील राजकारण आता अक्षरशः गुन्हेगारीच्या दलदलीत ओढले गेले आहे. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शहरातील वातावरण तापले असून माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर शनिवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला ठरवून, नियोजनबद्ध रित्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप निंबाळकर यांनी केला आहे. दरम्यान, सदर हल्लेखोर हा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्ते विजय राठोड, त्याने एका दुकानात घुसून निंबाळकर यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेनंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, स्थानिक राजकारणातील स्पर्धा, कुरघोडी आणि आरोप-प्रत्यारोप यांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निंबाळकर यांनी हा हल्ला “ठरवून आखलेला कट” असल्याचा आरोप करत, “या षडयंत्रामागे नेमका सूत्रधार कोण आहे, याचा पोलिसांनी सखोल तपास करावा,” अशी मागणी होत आहे.




दरम्यान, धाराशिव शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस राजकीय वैमनस्यातून हाणामाऱ्या, धमक्या आणि हल्ल्यांच्या घटना वाढत चालल्याने कायद्याचा धाक उरला आहे का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पोलिस प्रशासनाने या घटनेचा तात्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनेल, अशी मागणी शहरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित निंबाळकर?

दरम्यान “हॅलो धाराशिव”शी बोलताना, रोहित निंबाळकर म्हणाले की, ” मी ज्या दुकानात बसलो होतो त्या ठिकाणी विजय राठोड आला. त्याने दुकान मालकाशी वाद घालायला सुरुवात केली. मला वाटलं की, हा दुकान मालक आणि राठोड याचा वैयक्तिक वाद असेल. मात्र, त्याने माझ्यावर देखील हल्ला करत मला मारहाण सुरू केली.” माझ्यावर झालेला हल्ला हा कट असून, मी सदर घटने विरोधात पोलिसांकडे तक्रार देणार असल्याची माहिती रोहित निंबाळकर यांनी दिली”.

विजय राठोड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Previous Post

धाराशिवला जंक्शन होणार, अर्थकारणाला गती मिळणार, सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदिल : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

“धाराशिवमध्ये महायुतीत तणावाचा स्फोट! येणाऱ्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घोषणा”

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

Next Post

“धाराशिवमध्ये महायुतीत तणावाचा स्फोट! येणाऱ्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घोषणा”

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी संघटनात्मक फेरबदल – धाराशिवच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आता 'या' नेत्याच्या हाती येणार! "हॅलो धाराशिव"ला अधिकृत सूत्रांची माहिती

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share