• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

नळदुर्गसाठी महावितरणचा स्वतंत्र उपविभाग, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

नळदुर्ग शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या त्याचबरोबर विजेची वाढती मागणी ध्यानात घेऊन दर्जेदार सेवा या भागातील नागरिकांना मिळाव्यात यासाठी महावितरणच्या स्वतंत्र उपविभागीय कार्यालयाची मागणी आपण केली होती. महायुती सरकारने आपल्या मागणीला पाठबळ देत नळदुर्ग येथे विद्युत वितरण विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालयापाठोपाठ आता महावितरणचे उपविभागीय कार्यालय सुरू होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

सोलापूर – हैदराबाद महामार्गावरील ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून नळदुर्ग शहराला विशेष महत्त्व आहे. येथील भुईकोट किल्ला हा राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे. त्यामुळे देशभरातून याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अलीकडच्या काळात वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपले नियोजनबध्द काम सुरू आहे. त्यासाठी या परिसरात पायाभूत सोयी सुविधा उभारणीला आपण प्राधान्य देत आहोत. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणूनच विजेची वाढती मागणी, ग्राहकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार सुविधा आणि वितरणाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नळदुर्ग येथे महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आपण आग्रहाने लावून धरली होती. त्याला आपल्या महायुती सरकारने आता मंजुरी दिली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

या नव्या कार्यालयामुळे नळदुर्ग शहरासह परिसरातील गावांना वीज पुरवठा, नवीन जोडणी, दुरुस्ती- देखभाल, त्याचबरोबर तक्रार निवारण आदी सेवा स्थानिक पातळीवर तातडीने उपलब्ध होतील. यामुळे नागरिकांना तुळजापूर किंवा इतर ठिकाणी जावे लागणार नाही. नवीन उपविभागीय कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर वीज संबंधित तक्रारींचे जलद निराकरण होईल, नवीन कनेक्शन व मीटरिंगची प्रक्रिया गतीमान होईल, शेतकरी, उद्योगधंदे आणि घरगुती ग्राहकांसाठी थेट संपर्क सुविधा उपलब्ध होतील. बऱ्याच कालावधीपासून ही मागणी प्रलंबित होती. नळदुर्ग आणि परिसरातील पायाभूत सोयी सुविधा विकसित करण्यासाठी आपण सुरू केलेल्या पाठपुराव्याला यानिमित्ताने आणखी एक यश मिळाले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Previous Post

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याची प्रक्रिया सुरु, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

मोठी बातमी; पात्र अतिक्रमण धारकांनाही आता घरकुल मिळणार, जागेचे पट्टे मिळवून घेण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार

मोठी बातमी; पात्र अतिक्रमण धारकांनाही आता घरकुल मिळणार, जागेचे पट्टे मिळवून घेण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन

शिवभवानी’चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार. !ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

शिवभवानी'चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार. !ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिवमध्ये उबाठा गटाला बसणार पुन्हा मोठा झटका, अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share