• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

शिवभवानी’चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार. !ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0
शिवभवानी’चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार. !ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे १०८ फूट उंचीचे भव्य शिल्प तुळजापुरात आता लवकरच साकारले जाणार आहे. अष्टभुजा ‘शिवभवानी’चा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी विचार त्यानिमित्ताने सर्व भाविकांना अनुभवता येणार आहे. त्यासाठी राज्याच्या कला संचालनालयाकडे देशभरातील शिल्पकारांकडून शिल्प नमुने मागविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. ऑगस्ट अखेरीस अडीच ते तीन फूट आकाराचे फायबरचे शिल्प नमुने कला संचालनालयाकडे प्राप्त होणार आहेत. त्यातून पहिल्या पाच शिल्पांची निवड करून त्या पाच शिल्पापैकी एक शिल्प अंतिम केले जाणार आहे. हे शिल्प शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या प्रेरणेची जाज्वल्य गाथा असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. मुंबईच्या निर्मल भवन येथील मित्र संस्थेच्या कार्यालयामध्ये तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. किर्ती किरण पूजार हे देखील उपस्थित होते. या बैठकीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. १०८ फूट उंच शिल्प उभारण्याच्या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली. सुप्रसिद्ध इतिहासकार आणि शिवव्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी या प्रसंगाचे ऐतिहासिक संदर्भ, शिलालेख, ग्रंथ व लोक परंपरेवर आधारित माहिती सादर केली. राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी आई तुळजाभवानी देवीच्या मूर्तीचे स्वरूप सादर केले. या नियोजित भव्य शिल्पामुळे भाविकांना केवळ धार्मिक अनुभूतीच नव्हे तर राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे प्रेरणास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेत असलेला अद्वितीय आणि अनुपम देखावा अनुभवता येणार आहे. हे शिल्प श्रद्धा आणि प्रेरणेचे रोमांचक प्रतीक असणार आहे. या प्रेरणादायी आणि भव्य शिल्पाभोवती आकर्षक परिसर विकास, प्रकाश योजना, संग्रहालय व माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे. या शिल्पासाठी कला संचालनालय आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील नामवंत शिल्पकारांना शिल्पाचे नमुने सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ऑगस्ट अखेरीस अडीच ते तीन फूट आकाराचे फायबरचे शिल्प नमुने सादर करण्यात येणार आहेत. त्यातून उत्कृष्ट पाच शिल्प नमुन्याची निवड होणार आहे. या पाच सर्वोत्तम शिल्पापैकी सर्वोत्कृष्ट शिल्प निवडल्यानंतर प्रत्यक्ष शिल्प उभारणीस प्रारंभ केला जाईल. या उपक्रमामुळे तुळजापूरचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव नव्याने खुलणार आहे. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांनी आई तुळजाभवानी मातेच्या सेवेसाठी आपल्याला मोठे पाठबळ दिले आहे. शिवभक्तांना आणि भवानीमातेच्या भक्तांना त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आणि प्रेरणादायी भाग असलेला क्षण यामुळे अनुभवता येणार आहे. शिल्पकारांना मिळणार १७.५ लाख रुपये मानधन फायबर मॉडेल तयार करण्यासाठी इच्छुक शिल्पकारांकडे शिल्प कलेतील पदवी अथवा पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय किमान १५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणेही अपेक्षित आहे. तयार करण्यात आलेल्या फायबर मॉडेल्स मधून एकूण पाच मॉडेल्सची निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक शिल्पकाराला दीड लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच अंतिम निवड झालेल्या सादरकर्त्याला १० लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. देशभरातील कला उपासक शिल्पकारांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Previous Post

मोठी बातमी; पात्र अतिक्रमण धारकांनाही आता घरकुल मिळणार, जागेचे पट्टे मिळवून घेण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन

Next Post

धाराशिवमध्ये उबाठा गटाला बसणार पुन्हा मोठा झटका, अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

धाराशिवमध्ये उबाठा गटाला बसणार पुन्हा मोठा झटका, अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share