• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मोठी बातमी; पात्र अतिक्रमण धारकांनाही आता घरकुल मिळणार, जागेचे पट्टे मिळवून घेण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार

प्रधानमंत्री आवास योजना टप्पा -२ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात नवीन ७५ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र यातील अनेक जण शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याने त्यांच्याकडे जागा मालकीचा पुरावा न्हवता. मात्र महायुती सरकारच्या निर्णयाने सन २०११ पासून रहिवासी प्रयोजनाकरिता शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल केले जाणार असून १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल विभागाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे अनेकांचे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न आता साकार होणार आहे. शासनाकडून अतिक्रमण नियमानुकुल करून घेण्यास पात्र असलेल्या अतिक्रमण धारकांना जागेचे पट्टे वाटप केले जाणार आहेत. त्यासाठी पात्र असलेल्या अतिक्रमण धारकांनी आपापल्या गावातील तलाठी व ग्रामसेवकांशी तात्काळ संपर्क साधून जागेचे पट्टे मिळवून घ्यावेत, असे आवाहन ‘ मित्र’ चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

सर्व नागरिकांसाठी हक्काचे घर असावे हे आपल्या महायुती सरकारचे आणि केंद्र सरकारचे अधिकृत धोरण आहे. त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे हा त्यामागील प्रामाणिक उद्देश आहे. धाराशिव जिल्ह्यात त्यानुसार आपले सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यात बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अटल बांधकाम कामगार आवास योजना आदींची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. मात्र या सगळ्या महत्वपूर्ण आणि धोरणात्मक योजना राबविताना पात्र लाभार्थ्याकडे किमान २६९ चौरस फुट जागा स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे. या प्रमुख नियमामुळे अनेक नागरिकांना हक्काच्या घरापासून वंचित राहण्याची वेळ ओढवली जात असल्याची बाब महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून देत आग्रही पाठपुरावा करून पूर्वीच्या शासन आदेशाची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाला आदेश देण्याची विनंती केली होती. त्याला आता यश आले असून पात्र अतिक्रमणधारक नागरिकांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागात अनेक वर्षापासून गावठाण, गायरान व वस्तीवाढ जागेत अनेक नागरिक अतिक्रमण करून वास्तव्यास आहेत. त्या जागांच्या मालकीचे त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत पुरावे नाहीत. त्यामुळे अशा सर्व नागरिकांना ग्रामीण गृहनिर्माण योजनाचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. अशा तक्रारी आपल्यापर्यंत आल्यानंतर या प्रकरणाचा आपण सातत्याने पाठपुरावा केला. अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबत आपल्या महायुती सरकारने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी शासन आदेश काढला होता. त्यानुसार अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंबंधी जिल्हाधिकारी यांना आपण सूचना दिल्या होत्या. परंतु त्यात काही बाबी अस्पष्ट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेरचे उप सरपंच श्रीमंत फंड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य निहाल काझी या सजग पदाधिकाऱ्यांसह महसूल व ग्रामविकास सचिवांसोबत चर्चा केली. येणाऱ्या अडचणी त्यांना अवगत करून दिल्या. यावर देखील त्यांनी मार्ग काढले आहेत. याउपरही काही अडचणी आल्यास महसूलमंत्री ना . चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे यावर मार्ग काढण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले आहे.

महसूल विभागामार्फत राज्यभर १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहात शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवाशी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकुल करून घेण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप करण्यात येणार आहेत. तरी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांनी संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा आणि जागेचे पट्टे मिळवून घ्यावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Previous Post

नळदुर्गसाठी महावितरणचा स्वतंत्र उपविभाग, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

शिवभवानी’चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार. !ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post
शिवभवानी’चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार. !ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

शिवभवानी'चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार. !ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिवमध्ये उबाठा गटाला बसणार पुन्हा मोठा झटका, अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत

वा रे नौटंकी!
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके उद्धव सेनेवर बरसले.. आंदोलनावरून शहरातील वातावरण तापले, विरोधकही आक्रमक

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share